"माध्यमिक विद्यालय कर्मचारी जुलै वेतनवाढ कॅम्प इंदापूर तालुक्यात संपन्न"

इंदापूर (प्रतिनिधी): इंदापूर तालुक्यातील माध्यमिक विद्यालयांमधील सर्व कर्मचा-यांच्या जुलै 2021 वेतनवाढीसंबंधीचा कॅम्प 26 व 27 जुलै 2021 रोजी संपन्न झाला. पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग,पुणेच्या वेतन पथकाच्या शिक्षणाधिकारी मा.कविता शिंपी मॅडम यांचे आदेशानुसार आणि या विभागाचे राजेंद्र खरे यांचे मार्गदर्शनाखाली हे कॅम्प आयोजित करण्यात आले होते. दि. 26 व 27 जुलै 2021रोजी इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथील एन. ई एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आणि कौठळी येथील नूतन माध्यमिक विद्यालय या दोन ठिकाणी हे कॅम्प आयोजित करण्यात आले होते. ज्या सेवकांना जुलै 21 मध्ये वेतन वाढ देय आहे त्यांची वेतन वाढ ते ज्या लेव्हल मध्ये/स्केल मध्ये वेतन घेतात त्या मधील पुढील टप्पा बरोबर आहे का याची खात्री करून वेतनवाढ फॉरवर्ड करण्यात आली.यामध्ये वेतनवाढ प्रस्तावाच्या 63 शाळा पूर्ण झाल्या. हा उपक्रम खूपच शिस्तबद्ध पद्धतीत राबविण्यात आल्याचे मत म...