"अखिल भारतीय ओ.बी.सी. सेवा संघाच्या दौंड तालुका अध्यक्षपदी सौ.नंदिनी सचिन गायकवाड यांची निवड"

दौंड ( प्रतिनिधी):
अखिल भारतीय ओ.बी.सी. सेवा संघ, महाराष्ट्र या संस्थेच्या दौंड तालुका अध्यक्षपदी सौ.नंदिनी सचिन गायकवाड यांची नुकतीच निवड करण्यात आली. केडगांव परिसरामध्ये विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सौ.गायकवाड यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो. सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा आणि लोकसंपर्काचा फायदा आपल्या ओबीसी समाजाला हवा,या हेतूने त्यांची या पदावर निवड करण्यात आली आहे.

दौंड तालुका तसेच संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या केडगांव येथील सिद्धी फोटो स्टुडिओचे संस्थापक,प्रसिद्ध फोटोग्राफर,सामाजिक कार्यकर्ते श्री.सचिन गायकवाड यांच्या सौ. गायकवाड या पत्नी असून दौंड तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या प्रथम महिला फोटोग्राफर सदस्य होण्याचा बहुमान त्यांनी पटकावला आहे.
ओबीसी सेवा संघाच्या माध्यमातून परिसरातील विविध सामाजिक प्रश्नांवर काम करणार असल्याचे सौ.गायकवाड यांनी 'विश्वदीप न्यूज'च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Popular posts from this blog

"लोक माझे सांगाती- मा.बाळासाहेब आप्पा क्षिरसागर "

"प्रबोधनदूत योजनेच्या पुणे जिल्हा समन्वयकपदी श्री.योगेश आदलिंग यांची निवड"

" ज्ञानसंवर्धिनी प्रशालेची एस.एस.सी. परीक्षेच्या १०० % निकालाची परंपरा कायम "