"सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात प्रसिद्ध भारतीय रसायनशास्त्रज्ञ सर प्रफुलचंद्र रे व इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांची जयंती उत्साहात साजरी"

केडगांव ( वार्ताहर):
            केडगांव येथील सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने दि. 12 ऑगस्ट रोजी भारतीय अवकाश संशोधन केंद्र म्हणजेच इस्रोचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये इस्रोसंबंधीच्या ज्ञानवृद्धीसाठी प्रश्नमंजुषा घेण्यात आली. प्रश्नमंजुषेमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला.  याप्रसंगी प्राचार्य नंदकुमार जाधव यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की , भारतीय अंतराळ संशोधन केंद्राचा विकास ज्या पद्धतीने झाला, त्यामध्ये विक्रम साराभाई यांनी पायाभूत योगदान दिले. विद्यार्थ्यांनी भारतीय संशोधकांचा आदर्श घेऊन संशोधन क्षेत्रात आपले सक्रिय योगदान दिले पाहिजे.
                  महाविद्यालयामधील रसायनशास्त्र विभागाद्वारे  2 ऑगस्ट रोजी भारतीय औषध निर्मिती शास्त्राचे जनक सर प्रफुलचंद्र रे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय रसायनशास्त्र दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी सुद्धा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार जाधव यांनी विद्यार्थ्यांना नवीनतम तत्त्वज्ञानाचा वापर करून औषध संशोधन शास्त्रामधील उपलब्ध असणाऱ्या संधी विषयक तसेच सर प्रफुल चंद्र रे यांच्या योगदानाची माहिती दिली
               याप्रसंगी नेताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत शेळके, सचिव धनाजी शेळके, कार्याध्यक्ष सुनील निंबाळकर,  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार जाधव, आय.क्यू.ए.सी. प्रमुख डॉ. राजेंद्र गायकवाड, महाविद्यालय विकास समिती व भूगोल विभाग प्रमुख अशोक दिवेकर, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. भाऊसाहेब दरेकर, मराठी विभाग प्रमुख डॉ. भाऊसाहेब गव्हाणे, बी.व्होक. विभागप्रमुख प्रा. ओंकार अवचट, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. अरविंद मिंधे, रसायशास्त्र विभागप्रमुख प्रा. अमोल शेलार, प्रा. गणेश निंबाळकर, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. पल्लवी सातपुते, डॉ. श्याम वासनिकर, प्रा. शिल्पा नांदखेले आणि वाणिज्य व विज्ञान विभागातील सर्व प्राध्यापक , प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रिया ढमढरे, प्रा. माया होळकर, प्रा . धनश्री खळदकर,प्रा. वंदना लकडे,  प्रा. संपदा सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची रूपरेषा प्रा. प्रिया ढमढेरे व प्रा. माया होळकर यांनी सांगितली आणि  प्रा . धनश्री खळदकर यांनी आभार व्यक्त केले.

Popular posts from this blog

"प्रबोधनदूत योजनेच्या पुणे जिल्हा समन्वयकपदी श्री.योगेश आदलिंग यांची निवड"

"गणितातली कोडी उलगडण्यासाठी 'पाय' महत्त्वाचा : क. का. वाघ महाविद्यालयातील पाय दिन कार्यक्रमात प्रा.तुषार खैरनार यांचे प्रतिपादन"