" ज्ञानसंवर्धिनी प्रशालेची एस.एस.सी. परीक्षेच्या १०० % निकालाची परंपरा कायम "
शिरवळ( वार्ताहर):
ज्ञानसंवर्धिनी शिक्षण संस्था, शिरवळ संचलित विविध विभागांतील एस.एस.सी. परीक्षेच्या १०० % निकालाची परंपरा याही वर्षी कायम राहिली असून प्रशालेतील इयत्ता दहावीच्या 214 विद्यार्थ्यांपैकी 34 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळवत उज्वल यश संपादन केले आहे. याबरोबरच इतर सर्व विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणी प्राप्त करत यशस्वी झाले आहेत.
ज्ञानसंवर्धिनी माध्यमिक विभागातील प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी खालीलप्रमाणे:
कु. मळेकर प्रणिती संतोष (९७.०० %)- प्रथम क्रमांक, कु.कुलकर्णी पूर्वा मनिष ( ९६.२० %)- द्वितीय क्रमांक ,कु. कदम श्रद्धा संतोष ( ९६.२० %)- द्वितीय क्रमांक,कु.घाडगे वेदांतिका निलेश (९५.६० %)- तृतीय क्रमांक.
ज्ञानसंवर्धिनी इंग्लिश मीडियम विभागातील प्रथम तीन क्रमांक खालीलप्रमाणे :
कु. गायकवाड गुंजन रवींद्र (९७.८० %) -प्रथम क्रमांक , कु. जाधव गार्गी गणेश(९५.६० %)- द्वितीय क्रमांक, चि. कांबळे स्वरूप सुनिल (९५.६० %)- द्वितीय क्रमांक,कु. कुंभार आदिती अमोल (९५.०० %) - तृतीय क्रमांक.
सौ.सुशिलाताई परांजपे विद्यालय, अतिट विद्यालयातील प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी खालीलप्रमाणे:
चि. जाधव वेदांत शंकर (९५.८० %)- प्रथम क्रमांक,कु. लेकावळे प्रणाली विजय (९०.०० %)- द्वितीय क्रमांक, कु. जाधव वैष्णवी संजय (८८.०० %)- तृतीय क्रमांक.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ. विनय जोगळेकर , उपाध्यक्ष ॲड. बाळकृष्ण पंडित, सचिव श्री. रमेश देशपांडे सर तसेच संचालक श्री. ईश्वरभाई जोशी आणि सर्व विभागातील मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.