"प्रबोधनदूत योजनेच्या पुणे जिल्हा समन्वयकपदी श्री.योगेश आदलिंग यांची निवड"

निमगांव केतकी ( वार्ताहर) :
                  श्री.केतकेश्वर विद्यालय आणि जुनिअर कॉलेज येथे आज राजमाता जिजाबाई व स्वामी विवेकानंद जयंती कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपशिक्षिका सौ.साधना तावरे मॅडम होत्या . त्यांनी तसेच इतर काही शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून नुकतेच नवनीत समूहाने Tr. फॉर टीचर या कॅम्पेन अंतर्गत आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित केलेले उपशिक्षक श्री.योगेश आदलिंग सर यांची ज्ञानप्रबोधिनी, पुणे यांच्यामार्फत राबवण्यात येणाऱ्या  'प्रबोधनदूत योजनेच्या जिल्हा समन्वयकपदी नेमणूक झाल्याने त्यांचा आज या कार्यक्रम प्रसंगी उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला.


       यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री.भोंग एम.बी. यांनी श्री.आदलिंग सरांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
   यावेळी पर्यवेक्षक खान सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.भोंग के.डी. यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.वनवे मॅडम यांनी मानले.

Popular posts from this blog

"मएसोच्या देशपांडे विद्यालयात रंगला ४५ वा वार्षिक क्रीडा महोत्सव"

"ज्ञानसंवर्धिनी प्रशालेची राज्यस्तरीय शालेय डाॅजबाॅल स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी"