"MSME च्या स्फूर्ती योजनेवर पुणे येथे कार्यशाळा संपन्न"

पुणे (प्रतिनिधी):
        स्पार्टबन सोशल वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडिया,पुणे आणि महात्मा फुले समाज सेवा मंडळ,करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकारच्या लघु सूक्ष्म व उद्योग मंत्रालयाच्या MSME स्फूर्ती योजनेची माहिती देण्यासाठी रविवार,दिनांक 18 जुलै 2021 रोजी एस.एम.जोशी फाउंडेशन, पुणे येथे पार पडली
                या कार्यशाळेत स्वयंसेवी संस्थांचे 40 हुन अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. स्फूर्ती कार्यक्रमाची महाराष्ट्रातील तांत्रिक सहाय्यकारी संस्था, एस.जी. फाउंडेशन, नाशिकचे प्रमुख नितीन सोनवणे यांनी या योजनेची सविस्तर माहिती पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे दिली. कार्यक्रमाच्या शेवटी खुली चर्चा व प्रश्नोत्तरे झाली.
            ज्या स्वयंसेवी संस्था या योजनेच्या अटी पूर्ण करू शकतील त्यांना प्रकल्प बनवणे,पाठपुरावा व मंजुरी नंतरच्या सेवा यासाठी एस.जी.फाऊंडेशन सहकार्य करणार आहे. कार्यशाळेच्या स्थानिक आयोजनाची जबाबदारी उदयकाळ फाउंडेशन,पुणेचे मयूर बागुल यांनी स्पार्टबन सोशल वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ.प्रशांत खांडे तसेच महात्मा फुले समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. 
                 या कार्यशाळेत अफार्मचे माजी कार्यकारी संचालक कोंढाळकर सर,पर्यायचे विश्वनाथ अण्णा तोडकर व प्रकाश पाळंदे यांनीही उपस्थित संस्था प्रतिनिधींबरोबर चर्चा केली.
या स्वरूपाच्या पुढील कार्यशाळा  नाशिक- उत्तर महाराष्ट्र, कळंब- मराठवाडा, अमरावती- विदर्भ व कोकण या ठिकाणी तेथील स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणार आहेत.
         जास्तीत जास्त स्वयंसेवी संस्थांनी या स्फूर्ती योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन डॉ.प्रशांत खांडे आणि प्रमोद झिंजाडे यांनी केले.

Popular posts from this blog

"सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात प्रसिद्ध भारतीय रसायनशास्त्रज्ञ सर प्रफुलचंद्र रे व इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांची जयंती उत्साहात साजरी"

"गणितातली कोडी उलगडण्यासाठी 'पाय' महत्त्वाचा : क. का. वाघ महाविद्यालयातील पाय दिन कार्यक्रमात प्रा.तुषार खैरनार यांचे प्रतिपादन"

"लोक माझे सांगाती- मा.बाळासाहेब आप्पा क्षिरसागर "