" प्रा.विद्याधर नलवडे यांना गणित विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान "
इंदापूर (प्रतिनिधी):
खाडकोनी (ता. बार्शी जि.सोलापूर ) येथील रहिवासी असलेले आणि आर.जी.शिंदे महाविद्यालय, परांडा (ता.परांडा,जि.उस्मानाबाद) येथील गणित विभागात कार्यरत असलेले प्रा.विद्याधर विठ्ठलराव नलवडे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड यांच्याकडून गणित विषयातील पीएच.डी. पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली.त्यांनी " Study of Banach Contraction Mapping Principle and Some Fixed Point Theorems in Metric Spaces " या घटकावर डॉ.यु.पी.डोल्हारे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. त्यांनी आपले महाविद्यालयीन पदवीचे शिक्षण इंदापूर येथील कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि पुणे येथील सर परशुराम महाविद्यालय येथून पूर्ण केले.तसेच,पदव्युत्तर M.Sc. ही पदवी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गणित विभागातून पूर्ण केली.याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गणित अभ्यासमंडळाचे अध्यक्ष डॉ.बी.आर. सोनवणे,गणित विभागप्रमुख डॉ.एस. के. पांचाळ तसेच, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या गणित अभ्यासमंडळाचे अध्यक्ष डॉ.एस. एम. जोगदंड,स्कूल ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसचे संचालक डॉ.डी.डी.पवार , बसमत येथील बी.एस. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एन. इंगळे,पीएच.डी. मार्गदर्शक डॉ.यु. पी. डोल्हारे आणि संशोधक विद्यार्थी श्री.लटपटे हे उपस्थित होते.
त्यांच्या या यशाबद्दल परिसरामध्ये सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.