"बाबीर विद्यालयाचा इयत्ता दहावीचा 100 % निकाल"

इंदापूर ( प्रतिनिधी):
           रुई ( ता.इंदापूर ,जि.पुणे) येथील श्री बाबीर विद्यालयाचा  चालू वर्षीचा  इयत्ता 10 वीचा निकाल 100% लागल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील यांनी दिली.
  विद्यालयातील प्रथम तीन क्रमांक खालीलप्रमाणे आहेत.
1) कु. सानिका संदीप कांबळे : 97:80%
2) कु.देवकाते प्रतीक्षा हनुमंत : 96:40%
2) कु.थोरात प्रतीक्षा कांतीलाल : 96:40%
2) कुंभार तुषार शिवाजी : 96:40%
3) कु.लावंड केतकी वैजनाथ : 96:0 %

 परीक्षेला एकूण  83 विद्यार्थी बसले होते त्यांपैकी सर्वच 83 विद्यार्थी पास झाले.
 इयत्ता दहावीत प्रथम आलेले तीन आणि इतर सर्वच पास झालेले विद्यार्थी यांचे संस्थचे अध्यक्ष अमरसिंह आत्माराम पाटील,उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, सचिव विश्वजित करे, पोलीस पाटील अजितसिंह पाटील,तसेच सर्व कार्यकारी मंडळ,विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील, पर्यवेक्षक तानाजी मराडे,सर्व शिक्षक-शिक्षिका व कर्मचारी वृंद यांनी वरील सर्वांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

Popular posts from this blog

"सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात प्रसिद्ध भारतीय रसायनशास्त्रज्ञ सर प्रफुलचंद्र रे व इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांची जयंती उत्साहात साजरी"

"गणितातली कोडी उलगडण्यासाठी 'पाय' महत्त्वाचा : क. का. वाघ महाविद्यालयातील पाय दिन कार्यक्रमात प्रा.तुषार खैरनार यांचे प्रतिपादन"

"लोक माझे सांगाती- मा.बाळासाहेब आप्पा क्षिरसागर "