"इंदापूर येथील आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुरू"

इंदापूर (प्रतिनिधी):
            इंदापूर येथील महाराष्ट्र शासनाच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( आयटीआय) ची प्रवेश प्रक्रिया दिनांक 16 जुलै 2021 पासून ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेली आहे. प्रवेशासाठी खालील वेबसाईटवर जाऊन अर्ज भरणे, ऑनलाईन शुल्क भरून प्रवेश अर्ज निश्चित करणे, ऑप्शन फॉर्म भरून आयटीआयची निवड करणे या सर्व प्रक्रिया प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांना पार पाडाव्या लागणार आहेत.

प्रवेशासाठीची वेबसाईट (संकेतस्थळ) खालीलप्रमाणे आहे :


चालू शैक्षणिक वर्षासाठी इंदापूर येथील आयटीआयमध्ये एक वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमांसाठी खालीलप्रमाणे ट्रेडनुसार जागा उपलब्ध आहेत.
वेल्डर : 60 जागा,
शीट मेटल वर्कर : 20 जागा ,  
ड्रेस मेकिंग :  20 जागा .

याबरोबरच दोन वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमांसाठी खालीलप्रमाणे जागा उपलब्ध आहेत.

मेकॅनिक मोटार व्हेइकल : 24 जागा , 
ईलेक्ट्रिशन : 20 जागा, 
वायरमन: 20 जागा, 
फिटर : 40 जागा, 
टर्नर : 20 जागा, 
मशिनिस्ट : 20 जागा , 
रेफ्रिजेरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक: 24 जागा,
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक: 24 जागा.


Popular posts from this blog

"सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात प्रसिद्ध भारतीय रसायनशास्त्रज्ञ सर प्रफुलचंद्र रे व इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांची जयंती उत्साहात साजरी"

" ज्ञानसंवर्धिनी प्रशालेची एस.एस.सी. परीक्षेच्या १०० % निकालाची परंपरा कायम "

"प्रबोधनदूत योजनेच्या पुणे जिल्हा समन्वयकपदी श्री.योगेश आदलिंग यांची निवड"