" अक्षर मानवतर्फे अरण्यगुरु मारुती चित्तमपल्ली यांच्या 'सापांचं पर्यावरणातील व शेतीतलं महत्व ' या विषयावरील ऑनलाईन चर्चासत्राचे १८ जुलैला आयोजन "

इंदापूर (प्रतिनिधी):
    ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या "अक्षर मानव" या अभिनव सामाजिक संस्थेच्या आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण आणि शेती विभागाच्या मार्फत अरण्यगुरु मारुती चित्तमपल्ली यांच्यासोबत एका विशेष अनुभवांच्या भन्नाट चर्चासत्राचे आयोजन रविवार , दि. १८ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेमध्ये गुगल मीटच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. या चर्चासत्रामध्ये ते आपल्याला "सापांचं पर्यावरणातील व शेतीतीलं महत्त्व , तसेच सापांविषयी असलेले गैरसमज आणि घ्यायची खबरदारी"  याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
 अरण्यगुरु मारुती चित्तमपल्ली यांनी चकवा-चांदणं, केशराचा पाऊस, रानवाटा, पक्षीकोष ,जंगलाच देणं, चैत्रपालवी अशा अनेक पुस्तकांमधून आणि प्रत्यक्ष जगण्यातून निसर्ग समजावून सांगण्याची किमया साधलेली आहे. अशा या अवलिया निसर्ग साधकाला ऐकण्याची संधी या चर्चासत्राच्या माध्यमातून आपणांस उपलब्ध होत आहे. तरी जास्तीत जास्त निसर्गप्रेमींनी या चर्चासत्रामध्ये सहभागी होण्याचे आवाहन अक्षर मानवचे आपत्ती व्यवस्थापन विभागप्रमुख हेमंत गजभिये आणि अमित मंगल अरुण, पर्यावरण विभागप्रमुख अरुण मापारी , शेती विभागप्रमुख सुदेश इंगळे तसेच योग विभागप्रमुख दिपेश मोहिते यांनी केले आहे.

या चर्चासत्राची गुगल मीट लिंक खालील प्रमाणे आहे.

 गुगल मीट लिंक: https://meet.google.com/wjr-pyqf-rjc

Popular posts from this blog

"सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात प्रसिद्ध भारतीय रसायनशास्त्रज्ञ सर प्रफुलचंद्र रे व इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांची जयंती उत्साहात साजरी"

"गणितातली कोडी उलगडण्यासाठी 'पाय' महत्त्वाचा : क. का. वाघ महाविद्यालयातील पाय दिन कार्यक्रमात प्रा.तुषार खैरनार यांचे प्रतिपादन"

"लोक माझे सांगाती- मा.बाळासाहेब आप्पा क्षिरसागर "