"ज्ञानसंवर्धिनी प्रशालेची राज्यस्तरीय शालेय डाॅजबाॅल स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी"

शिरवळ ( वार्ताहर) :
  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र व लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,लातूर तसेच महाराष्ट्र डॉट बॉल संघटना यांच्या वतीने दिनांक नऊ ते अकरा डिसेंबर 2023 दरम्यान उदगीर ( जि. लातूर ) या ठिकाणी आयोजित राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेमध्ये शिरवळ(जि.सातारा) येथील ज्ञानसंवर्धिनी माध्यमिक विद्यालयाच्या 17 वर्षाखालील मुलींच्या संघाने चमकदार कामगिरी करत तृतीय क्रमांक मिळविला.जिल्हास्तर तसेच विभाग स्तरावर अव्वल कामगिरी करून राज्यस्तरावर शालेय स्पर्धेमध्ये मजल मारणारा प्रशालेतील हा पहिलाच संघ आहे.या संघातील कु.संस्कृती गाडगे व कु.समृद्धी नेवसे यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. तसेच, मुलांच्या संघातून चि.ऋतुराज माने याची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे .
    मुलींच्या संघांमध्ये संस्कृती घाडगे, समृद्धी नेवसे,अनुष्का कांबळे, साक्षी धनवडे, गायत्री देवरासे, सृष्टी नेवसे,तन्वी जगताप,संस्कृती सोमवंशी,प्रज्ञा तळेकर व अनुजा चव्हाण या विद्यार्थिनींचा समावेश होता.या स्पर्धेसाठी त्यांना क्रीडाशिक्षक सौ.भंडलकर व्ही.एस. तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. क्षीरसागर एस.आर. यांचे मार्गदर्शन लाभले.
            विद्यार्थिनींच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनय जोगळेकर,उपाध्यक्ष ॲड. बाळकृष्ण पंडित, सचिव श्री.रमेश देशपांडे सर तसेच सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Popular posts from this blog

"सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात प्रसिद्ध भारतीय रसायनशास्त्रज्ञ सर प्रफुलचंद्र रे व इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांची जयंती उत्साहात साजरी"

"गणितातली कोडी उलगडण्यासाठी 'पाय' महत्त्वाचा : क. का. वाघ महाविद्यालयातील पाय दिन कार्यक्रमात प्रा.तुषार खैरनार यांचे प्रतिपादन"

"लोक माझे सांगाती- मा.बाळासाहेब आप्पा क्षिरसागर "