Posts

Showing posts from August, 2026

'आजी: कुटुंबाचं आगळ' पाठ झाला जिवंत! कोथरूडच्या महेश विद्यालयातील उपक्रमाने जिंकली सर्वांची मने

Image
पुणे | प्रतिनिधी कोथरूड येथील महेश विद्यालयात इयत्ता दहावीच्या मराठी विषयातील "आजी: कुटुंबाचं आगळ" या पाठाचे लेखक डॉ. महेंद्र कदम यांच्या विशेष उपस्थितीत आयोजित संवाद कार्यक्रम विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थित मान्यवरांसाठी अविस्मरणीय ठरला. पाठातील आशय विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत पोहोचावा यासाठी शाळेने केलेले सर्जनशील नियोजन सर्वांचे लक्ष वेधून घेणारे होते. कार्यक्रमस्थळी पारंपरिक वाडा, त्याचे भव्य दरवाजे आणि 'आगळ' यांची प्रतिकृती उभारण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाठातील वातावरण प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली. या देखण्या सादरीकरणामुळे साहित्याचा अनुभव अधिक जिवंत आणि प्रभावी झाला. कार्यक्रमातील सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे विद्यार्थ्यांनी डॉ. महेंद्र कदम यांची घेतलेली मुलाखत. विद्यार्थ्यांनी अत्यंत नेमके, अभ्यासपूर्ण आणि विचारांना चालना देणारे प्रश्न विचारत संवाद अधिक अर्थपूर्ण केला. सलग दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी पूर्ण एकाग्रतेने सहभागी झाले होते. त्यांच्या जिज्ञासू वृत्तीने आणि उत्स्फूर्त सहभागाने उपस्थितांची मने जिंकली. विद्य...

'बिंदास कट्टा'त शिक्षण, पालकत्व आणि सामाजिक विषयांवर मनमोकळी चर्चा

Image
पुणे, दि. 2 ऑगस्ट : बिंदास जिंदगी फाउंडेशनच्या वतीने रविवारी (दि. 2 ऑगस्ट 2026) आयोजित करण्यात आलेला 'बिंदास कट्टा' उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आनंदी वातावरण, मनमोकळे संवाद आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव या त्रिसूत्रीवर आधारित या उपक्रमात सदस्यांनी विविध सामाजिक विषयांवर सखोल विचारमंथन केले. या संवाद सत्रात मुलांचे शिक्षण, त्यांच्यातील कौशल्य विकास, बदलत्या काळातील पालकांची भूमिका तसेच मुलांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी आवश्यक बाबींवर विस्तृत चर्चा करण्यात आली. उपस्थित सदस्यांनी आपले अनुभव, विचार आणि सूचना मोकळेपणाने मांडल्याने अनेक सकारात्मक कल्पना व नव्या दृष्टीकोनांची देवाणघेवाण झाली. अशा प्रकारच्या भेटी केवळ गप्पागोष्टींसाठी नसून, त्या परस्परांतील विश्वास, मैत्री, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करण्याचे प्रभावी माध्यम ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. एकमेकांच्या अनुभवांतून शिकत समाजात सकारात्मक बदल घडविण्याची प्रेरणा अशा संवादातून मिळत असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. या कार्यक्रमास नीलिमा शिकारखाने, सुवर्णा जोशी, दत्...