'बिंदास कट्टा'त शिक्षण, पालकत्व आणि सामाजिक विषयांवर मनमोकळी चर्चा

पुणे, दि. 2 ऑगस्ट : बिंदास जिंदगी फाउंडेशनच्या वतीने रविवारी (दि. 2 ऑगस्ट 2026) आयोजित करण्यात आलेला 'बिंदास कट्टा' उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आनंदी वातावरण, मनमोकळे संवाद आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव या त्रिसूत्रीवर आधारित या उपक्रमात सदस्यांनी विविध सामाजिक विषयांवर सखोल विचारमंथन केले.

या संवाद सत्रात मुलांचे शिक्षण, त्यांच्यातील कौशल्य विकास, बदलत्या काळातील पालकांची भूमिका तसेच मुलांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी आवश्यक बाबींवर विस्तृत चर्चा करण्यात आली. उपस्थित सदस्यांनी आपले अनुभव, विचार आणि सूचना मोकळेपणाने मांडल्याने अनेक सकारात्मक कल्पना व नव्या दृष्टीकोनांची देवाणघेवाण झाली.
अशा प्रकारच्या भेटी केवळ गप्पागोष्टींसाठी नसून, त्या परस्परांतील विश्वास, मैत्री, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करण्याचे प्रभावी माध्यम ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. एकमेकांच्या अनुभवांतून शिकत समाजात सकारात्मक बदल घडविण्याची प्रेरणा अशा संवादातून मिळत असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या कार्यक्रमास नीलिमा शिकारखाने, सुवर्णा जोशी, दत्तात्रय मारणे, विश्वास तांबे, श्रीधर जवंदाळ, डॉ. हेमंत जाधव आणि शब्बीर शेख हे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम उत्साही वातावरणात संपन्न झाला.

Popular posts from this blog

"सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात प्रसिद्ध भारतीय रसायनशास्त्रज्ञ सर प्रफुलचंद्र रे व इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांची जयंती उत्साहात साजरी"

" ज्ञानसंवर्धिनी प्रशालेची एस.एस.सी. परीक्षेच्या १०० % निकालाची परंपरा कायम "

"ज्ञानसंवर्धिनी प्रशालेची राज्यस्तरीय शालेय डाॅजबाॅल स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी"