" सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर "
पुणे (प्रतिनिधी):
पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०२१ मधील पीएच.डी. अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली असून यासंबंधीचे वेळापत्रक विद्यापीठाने नुकतेच जाहीर केले आहे. विविध ७२ विषयांमधील पीएच.डी. अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असून प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.यासंबंधीचे सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
▪️प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात : दि. १२ जुलै २०२१
▪️प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख : दि. ३१ जुलै २०२१
▪️प्रवेश परीक्षेची तारीख : दि. २२ ऑगस्ट २०२१
▪️प्रवेश परीक्षेचा निकाल : दि. २४ ऑगस्ट २०२१
▪️ऑनलाईन अर्जासाठीची वेबसाईट:
या परीक्षेसाठी २ तासांचा अवधी दिलेला असून सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० या दरम्यान उमेदवार ही परीक्षा देऊन शकतो.राखीव संवर्गातील उमेदवारांसाठी ४५ % गुण तर अराखीव संवर्गातील उमेदवारांसाठी ५० % गुण उत्तीर्ण होण्यास आवश्यक आहेत.
इतर सविस्तर माहिती खालील लिंकवर उपलब्ध आहे.