"निमगांव केतकीचे सुपुत्र अभिजीत घनवट यांना गणित विषयातील पीएच.डी. प्रदान"

निमगांव केतकी (प्रतिनिधी):
निमगांव केतकी (ता.इंदापूर,जि.पुणे) येथील अभिजीत आत्माराम घनवट यांना तमिळनाडूमधील चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूट यांच्याकडून गणित विषयातील पीएच.डी. पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली.त्यांनी " Flexible surfaces in 4-manifolds and embeddings of low dimensional manifolds " या घटकावर संशोधन केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले महाविद्यालयीन पदवीचे शिक्षण इंदापूर येथील कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय येथून पूर्ण केले.तसेच,पदव्युत्तर  M.Sc. ही पदवी सुवर्णपदक पटकावून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गणित विभागातून  पूर्ण केली.
त्यांच्या या यशाबद्दल परिसरामध्ये सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.






Popular posts from this blog

"लोक माझे सांगाती- मा.बाळासाहेब आप्पा क्षिरसागर "

"प्रबोधनदूत योजनेच्या पुणे जिल्हा समन्वयकपदी श्री.योगेश आदलिंग यांची निवड"

" ज्ञानसंवर्धिनी प्रशालेची एस.एस.सी. परीक्षेच्या १०० % निकालाची परंपरा कायम "