" पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर "

सोलापूर (प्रतिनिधी):

सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २०२१ मधील पीएच.डी. अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली असून यासंबंधीचे वेळापत्रक विद्यापीठाने नुकतेच जाहीर केले आहे. विविध ३४ विषयांमधील पीएच.डी. अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असून प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.यासंबंधीचे सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

▪️प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात : दि. १२ जुलै २०२१

▪️प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख : दि. ७ ऑगस्ट २०२१

▪️प्रवेश परीक्षेची तारीख : दि. १७ व १८ ऑगस्ट २०२१

▪️प्रवेश परीक्षेची उत्तरसूची होण्याची तारीख : दि. २० ऑगस्ट २०२१

▪️प्रवेश परीक्षेची अंतिम उत्तरसूची प्रसिध्द होण्याची तारीख : दि. २६ ऑगस्ट २०२१

▪️प्रवेश परीक्षेचा निकाल : दि. ३० ऑगस्ट २०२१

▪️ऑनलाईन अर्जासाठीची वेबसाईट: 


या परीक्षेसाठी राखीव संवर्गातील उमेदवारांसाठी  ८०० रुपये तर अराखीव संवर्गातील उमेदवारांसाठी १२०० रुपये परीक्षा फी आहे.
इतर सविस्तर माहिती खालील लिंकवर उपलब्ध आहे.







Popular posts from this blog

"सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात प्रसिद्ध भारतीय रसायनशास्त्रज्ञ सर प्रफुलचंद्र रे व इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांची जयंती उत्साहात साजरी"

"गणितातली कोडी उलगडण्यासाठी 'पाय' महत्त्वाचा : क. का. वाघ महाविद्यालयातील पाय दिन कार्यक्रमात प्रा.तुषार खैरनार यांचे प्रतिपादन"

"लोक माझे सांगाती- मा.बाळासाहेब आप्पा क्षिरसागर "