"सनराईज इंग्लिश मीडियम स्कूलची इयत्ता १० वीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम"

टेंभुर्णी (प्रतिनिधी):
        टेंभुर्णी (ता.माढा,जि.सोलापूर) येथील "सनराईज इंग्लिश मीडियम स्कूलने" महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वीच्या परीक्षेतील शंभर टक्के निकालाची आपली परंपरा याही वर्षी अबाधित राखली आहे.विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांत तसेच क्रीडा प्रकारांतदेखील उत्तम कामगिरी करत  हे उत्तुंग यश संपादन केल्याबद्दल एका विशेष सत्कार समारंभाचे आयोजन प्रशालेच्या प्रांगणामध्ये 17 जुलै 2021 रोजी उत्साहात करण्यात आले होते.
     कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती. अनुराधा काकी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे चेअरमन श्री.योगेश(बाबा) बोबडे सर यांनी भूषवले. याप्रसंगी संस्थेच्या सचिवा सौ. सुरजा बोबडे मॅडम याही उपस्थित होत्या.
प्रशालेतील 23 विद्यार्थ्यांना 90% पेक्षा जास्त गुण , तर 11 विद्यार्थ्यांना विज्ञान विषयामध्ये 100 पैकी 100 गुण असून समाजशास्त्र विषयामध्ये दोन विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण, तर गणित विषयांमध्ये 21 विद्यार्थ्यांना 90 पेक्षा जास्त गुण मिळेले आहेत.
     विद्यालयातील पहिले पाच यशस्वी विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत. 
# प्रथम क्रमांक :- चि.यश कदम. 99.20%
# द्वितीय क्रमांक :- चि.केतन कदम. 98.20%
# तृतीय क्रमांक :- चि.प्रसाद शिरसागर.97.20%
#  चौथा क्रमांक कु. दोशी समीक्षा 97%
# पाचवा क्रमांक चि. बोबडे विश्वतेज 96.60%

याप्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री.योगेशजी बोबडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भावी आयुष्यात कसे यशस्वी व्हावे,याविषयी मार्गदर्शन केले.याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक साठे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि स्कूलचे माजी प्राचार्य श्री.प्रभाकर सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सौ.कीर्ती चौधरी मॅडम तसेच कॉर्डिनेटर नेहा पांडे मॅडम आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राहुल जळकोटे सर व नेहा मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री.हेंबाडे सर यांनी केले व कार्यक्रमाची सांगता झाली.

Popular posts from this blog

"सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात प्रसिद्ध भारतीय रसायनशास्त्रज्ञ सर प्रफुलचंद्र रे व इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांची जयंती उत्साहात साजरी"

"गणितातली कोडी उलगडण्यासाठी 'पाय' महत्त्वाचा : क. का. वाघ महाविद्यालयातील पाय दिन कार्यक्रमात प्रा.तुषार खैरनार यांचे प्रतिपादन"

"लोक माझे सांगाती- मा.बाळासाहेब आप्पा क्षिरसागर "