पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट "भारत लिडरशीप ॲवार्ड 2021" चे मानकरी

इंदापूर(प्रतिनिधी):
   
 पुणे शहरालगतच्या पिंपरी चिंचवड परिसरामध्ये विविध शैक्षणिक संस्थांमधून केजीपासून ते पीएच.डी.पर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या कार्याबद्दल "पुणे टाइम्स" तर्फे  "पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट "चा सन्मान भारताचे माननीय राज्यपाल श्री.भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते करण्यात आला. या सन्मानाचा स्वीकार संस्थेचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर लांडगे आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी केला.
" पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट"  या संस्थेची स्थापना इंदापूर तालुक्याचे माजी खासदार कै. शंकररावजी पाटील (भाऊ) यांनी सप्टेंबर 1990 मध्ये केली. समाजातील विविध घटकांना प्राथमिक शिक्षणापासून ते अभियांत्रिकी, संगणकीय आणि व्यवस्थापन या सर्व शाखांचे सखोल शिक्षण देण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली .
संस्थेला मिळालेला हा सन्मान म्हणजे इंदापूर तालुकावासियांच्या दृष्टीने एक अभिमानाची बाब आहे.

Popular posts from this blog

"सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात प्रसिद्ध भारतीय रसायनशास्त्रज्ञ सर प्रफुलचंद्र रे व इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांची जयंती उत्साहात साजरी"

"लोक माझे सांगाती- मा.बाळासाहेब आप्पा क्षिरसागर "

"माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नंदिकेश्वर प्रगती विद्यालय,सराफवाडी येथे विविध स्पर्धा व उपक्रम संपन्न"