"अक्षर मानव"तर्फे दिनांक ११ जुलै रोजी "आहार - त्याचे महत्व, नियोजन आणि फायदे" या विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन

प्रतिनिधी:
ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या "अक्षर मानव" या अभिनव सामाजिक संस्थेच्या योग विभागामार्फत रविवार दिनांक ११ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेमध्ये "आहार - त्याचे महत्व, नियोजन आणि फायदे" या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये प्रसिद्ध आहारतज्ञ ओंकार कुलकर्णी हे "कोरोनाकाळातील सकस आहार,  कोरोनानंतरचा आहार, प्रतिकारशक्ती वाढवणारा आहार व त्याचे नियोजन, इतर साथींच्या तसेच संसर्गजन्य आजार व रोगांपासून बचावासाठीचा आहार" या मुद्द्यांवर मार्गदर्शन करणार आहेत.
 हे सत्र गुगल मीटच्या माध्यमातून ऑनलाईन होणार असून या सत्राला खालील लिंकद्वारे उपस्थित राहता येईल. 

सत्राची गुगल मीट लिंक :

https://meet.google.com/iae-efsx-eit?hs=224

या सत्रामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन अक्षर मानवचे योग विभागप्रमुख दिपेश मोहिते, सांगली जिल्हाप्रमुख जस्मिन तांबोळी आणि पुणे जिल्हाप्रमुख प्रगती गजभिये यांनी केले आहे.

Popular posts from this blog

"लोक माझे सांगाती- मा.बाळासाहेब आप्पा क्षिरसागर "

"प्रबोधनदूत योजनेच्या पुणे जिल्हा समन्वयकपदी श्री.योगेश आदलिंग यांची निवड"

" ज्ञानसंवर्धिनी प्रशालेची एस.एस.सी. परीक्षेच्या १०० % निकालाची परंपरा कायम "