"निमगांव केतकी येथे दहावीच्या 1984 बॅचकडून गुरुपौर्णिमा साजरी"
निमगांव केतकी ( प्रतिनिधी ):
निमगांव केतकी (ता.इंदापूर,जि.पुणे) येथील श्री.केतकेश्वर विद्यालयातील 1984 सालच्या इयत्ता 10 वी उत्तीर्ण बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांवरील प्रेमापोटी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुजनांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान केला आणि त्यांचे आशिर्वाद घेतले.
उद्योजक धनंजय चांदणे,मिलिंद कुलकर्णी सर,भाजीपाल्याचे प्रसिद्ध व्यापारी बाळासाहेब काळे,व्यावसायिक संजय व्होरा,प्रदीप जौंजाळ या 1984 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी श्री.जौंजाळ सर आणि श्री.एस.बी.शिंदे सर या गुरुजनांचा त्यांच्या घरी जाऊन सन्मान केला आणि त्यांचे आशिर्वाद घेऊन ही गुरुपौर्णिमा खऱ्या अर्थाने साजरी केली.