" पोपट बुनगे यांची एस न्यूज मराठीच्या पुणे जिल्हा वार्ताहरपदी निवड "
निमगांव केतकी ( प्रतिनिधी ):निमगांव केतकी (ता.इंदापूर,जि.पुणे) परिसरातील बुनगेवस्ती येथील पोपट खंडू बुनगे यांची "एस न्यूज मराठी" या वृत्तवाहिनीच्या पुणे जिल्हा वार्ताहरपदी नुकतीच निवड करण्यात आली. बुनगे हे चित्रकलेचे अभ्यासक व चित्रकार असून त्यांच्या चित्रकलेमुळे अनेक प्राथमिक शाळांच्या भिंती बोलक्या झाल्या आहेत. याबरोबरच परिसरातील एक नावाजलेले सर्पमित्र म्हणून त्यांची ओळख आहे. नागेशभाई सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे "कानोसा" हे वर्तमानपत्र तसेच "एस न्यूज मराठी " ही वृत्तवाहिनी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे.