"बारामतीकरांनी अनुभवली निसर्गातील रंगपंचमी"
बारामती(प्रतिनिधी):
आज संध्याकाळी बारामती परिसरामध्ये आकाशातील सूर्यप्रकाशाने एक वेगळेच विहंगम दृश्य निर्माण केले. ही निसर्गाची किमया बारामती येथील जिजामातानगर ( गुरुकृपा कॉलनी ,तांदुळवाडी रोड ) या परिसरामध्ये कॅमेराबद्ध केली आहे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. भगवान माळी यांनी.