Posts

"छत्रपती महाविद्यालयात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा"

Image
भवानीनगर( प्रतिनिधी):                     आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आज 21जून रोजी भवानीनगर येथील श्री छत्रपती कला, वाणिज्य महाविद्यालयात 'आंतरराष्ट्रीय योग दिन' राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ त्यांच्या वतीने  मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.            कार्यक्रमाचे प्रस्ताविक  उपप्राचार्य डॉ. संजय मोरे यांनी केले. विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.धुळदेव वाघमोडे यांनी योगाची विविध प्रात्यक्षिके विदर्थ्यांकडून करून घेतली.                          महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे यांनी योग दिनाचे महत्व सांगताना म्हटले कि, प्राचीन काळापासून योगा भारतामध्ये केला जातो. भारताने जगाला योगाच्या माध्यमातून मोठी देणगी दिली आहे.आरोग्यदायी व आनंददायी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने दररोज किमान एक तास योगा व ध्यानधारणा करणं गरजेचं आहे. आजच्या धकाधकी व ताणतणावाच्या युगात आरोग्य आणि आयुर्मान वृद्धिंगत जर क...

"काव्यमंच - आजची कविता : ती " कवी : प्रा.अमर नांदगुडे

Image

"महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त इंदापूरमध्ये विविध सामाजिक उपक्रमांद्वारे अभिवादन"

Image
इंदापूर (वार्ताहर):          भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती महोत्सवानिमित्त दि. १४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथे अनोख्या पद्धतीने व्यंकटेश फार्मा वेलनेस फोरेव्हर आणि संप्रीत सुशांत किर्ते मित्रपरिवार,अंबिकानगर यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करून अभिवादन करण्यात आले.या शिबिरात ब्लड,शुगर व बीपी यांची तपासणी करण्यात आली.           याप्रसंगी इंदापूर तालुक्याचे लाडके आमदार माननीय दत्तात्रयमामा भरणे यांनी स्वतःचा बीपी तपासून घेत शिबिरात आपला सहभाग नोदवला.या शिबिरामध्ये फार्मासिस्ट अक्षता किर्ते,वैष्णवी साळुंखे,मिलिंद कवितके,प्राची कुचेकर,रोहित उराडे व सागर कवितके यांनी उपस्थित रूग्णांची आरोग्य तपासणी केली.सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी आरपीआयचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजीराव मखरे,भिमाई आश्रमशाळेचे सचिव ॲड.समीर मखरे,नगरसेवक अशोक मखरे सर,सुधीरशेठ मखरे,जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आनंद ऊर्फ गोट्या मखरे व सचिव शुभम मखरे यांनी स...

"नंदिकेश्वर प्रगती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची कृषीपुरक उद्योगांना भेट"

Image
 सराफवाडी ( वार्ताहर):            इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नंदिकेश्वर प्रगती विद्यालय, सराफवाडी (ता.इंदापूर) मधील इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी सराफवाडी परिसरातील कृषीपूरक उद्योगांना नुकतीच भेट दिली. पुस्तकी ज्ञानाबरोबरच विविध व्यावसायिक कौशल्ये तसेच उद्योजकीय कौशल्ये विद्यार्थ्यांना अवगत व्हावीत म्हणून या भेटीचे आयोजन केल्याचे विज्ञान शिक्षक  श्री.नलवडे आर.एन. आणि  श्रीमती बरळ जे.एम. यांनी सांगितले.                           यावेळी सराफवाडी गावातील शेतकरी श्री.भारत अभंग यांच्या रेशीम उद्योग प्रकल्पाला विद्यार्थ्यांनी भेट दिली आणि रेशीम उद्योग प्रकल्प समजून घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांना तुती लागवडीपासून ते रेशीम अळीच्या वाढीच्या विविध अवस्था व त्या अवस्थांमध्ये त्यांना कशाप्रकारे खाद्य दिले जाते याविषयी सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांना घरबसल्या जोडधंदा उपलब्ध करून देणारा हा रेशीम उद्योग शेतकऱ्यांनी जरूर करावा असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. ...

" खेळ रंगला पैठणीचा,जल्लोष सार्‍या निमगांवचा "

Image
निमगांव केतकी ( वार्ताहर) :       जागतिक महिला दिन व गुढीपाडव्याचे औचित्य साधून निमगांव केतकी व परिसरातील माता भगिनींसाठी गुढीपाडव्यादिवशी तुषार (बाबा) जाधव मिञ परिवार यांच्या नियोजनातून तसेच श्री.देवराजभाऊ जाधव व श्री.अंकुशदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व सौ.सोनाली तुषार जाधव यांच्या संकल्पनेतून 'न्यू होम मिनिस्टर ' कार्यक्रम  आणि 'सन्मान नारीशक्तीचा' पुरस्कार वितरण सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले.ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रथमच अशाप्रकारच्या उपक्रमाचे आयोजन होत असल्यामुळे निमगांव केतकी व परिसरातील महिलावर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. दररोजच्या धकाधकीच्या व व्यस्त प्रापंचिक बाबींतून महिलांना यानिमित्त जरा उसंत मिळाली. त्यामुळे महिलांनी या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला.            यावेळी निमगांव केतकी परिसरातील २५ कर्तृत्ववान महिलांचा 'सन्मान नारीशक्तीचा' हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. विविध खेळांच्या माध्यमातून महिलांना लहान मोठ्या बक्षिसांचे वाटप करत सर्वांचे लाडके भाऊजी क्रांती मळेगावकर यांनी आपल्या गाणी...

"औक्षंण" कथेतील विचार अंमलात आणून पवार कुटुंबियांची एक नवी सुरुवात

Image
पुणे (वार्ताहर) : वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीला  दिर्घ  आयुष्य,  यश,  सुखसमाधान, आरोग्य  मिळावे ही भावना असते.  म्हणून वाढदिवसाच्या दिवशी त्यांचे औक्षंण केले जाते. अशी भावना फक्त स्त्रियांनाच नसून पुरूषांना देखील असते म्हणूनच त्यांनी देखील  औक्षंण केले पाहिजे. हा विचार सौ.सोनाली सुमित जाधव  यांनी त्यांच्या "औक्षंण" कथेत मांडला  आणि  या नव्या विचारांचा स्विकार   हडपसर येथील  श्री.सुनील सावळाराम पवार आणि सहपरि वाराने केला आणि आपला मुलगा  चि.शिवांश सुनील पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांचे औक्षंण करून एका नव्या चांगल्या रीतीची सुरूवात केली.    फक्त वाढदिवसाच्या दिवशीच नाही तर त्या प्रत्येक शुभप्रसंगी जेव्हा स्त्रिया औक्षंण करतात तेव्हा पुरूषांनीदेखील औक्षंण केले पाहिजे. या पवार कुटुंबियांबरोबरच परिसरातील श्री.महेशकुमार सरतापे , श्री. दिलीप चौधरी, श्री.सुनील ठाकरे , श्री.राहुल पाटील हा विचार अंगिकारला असून अंमलात आणला आहे.      " औक्षंण" कथेमुळे समाजात एक नवा विचार रुजत असल्याचे मत य...

"केतकेश्वर विद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिन आणि विज्ञान दिन उत्साहात साजरा"

Image
निमगांव केतकी (वार्ताहर):        निमगांव केतकी येथील श्री केतकेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिन आणि विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.     विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.खान सर यांच्या प्रमुख उपस्थितीत सरस्वती प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि  यावेळी महाराष्ट्रातील मराठी लोकसंस्कृती चे दर्शन घडविणारे पोवाडे,अभंग,कविता,लेझीम नृत्य, आणि विद्यार्थी व शिक्षक मनोगते अतिशय उत्साहात सादर करण्यात आले.    शिवजयंती निमित्ताने घेतलेल्या विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते श्री.के.डी. भोंग सरांनी पारितोषिके वितरित करण्यात केली.     विद्यालयातील मराठी व विज्ञान विषय शिक्षक समितीतील शिक्षकांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री.साळुंखे सर यांनी भूषविले. प्रास्ताविक  श्री.राऊत सर यांनी केले, शिक्षक मनोगत सौ.खोजे मॅडम आणि श्री.खंडागळे सर यांनी केले तर सौ.माळी मॅडम यांनी सुमधुर पसायदान म्हटले तसेच सूत्रसंचालन श्री.आ...

"विद्या प्रतिष्ठानच्या सुपे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर नारोळी येथे संपन्न"

Image
सुपे (वार्ताहर) :       सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे,राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्या प्रतिष्ठानचे सुपे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुपे यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे नारोळी ता.बारामती येथे २ ते ८ जानेवारी २०२३ दरम्यान विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.२ जानेवारी रोजी शिबिराचे उद्घाटन झाले.उद्घाटन प्रसंगी नारोळी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. मोनाली भंडलकर,पोलीस पाटील सौ.सुजाता ढमे,उपसरपंच दत्तात्रय ढमे, ग्रामसेविका दिपाली हिरवे,न्यू इंग्लिश स्कूल नारोळीचे मुख्याध्यापक हनुमंत ढमे, महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.दत्तात्रय शिंदे,प्रा.राजेंद्र चव्हाण, प्रा.दीपक लोणकर, प्रा.अजिंक्य वाबळे, ज्ञानदेव सोनवणे ,प्राध्यापिका आरती वाबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.       या शिबिरांतर्गत स्वयंसेवकांनी बेटी बचाओ बेटी पढाओ,मतदान हक्क, बालविवाह प्रतिबंध,स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध या विषयांवर  पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली.तसेच वृक्ष संवर्धन,ग्रामस्वच्छता,प्लास्टिक संकलन,शेतकऱ्यांसाठी ई पिक पाहणी, हिमोग्लोबिन तप...

"तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात अर्थशास्त्रातील रोजगार संधी या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान"

Image
 बारामती ( वार्ताहर) :    दि.२७ डिसेंबर                   तुळजाराम चतुरचंद कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती येथे दि.२७ डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या अंतर्गत अर्थशास्त्र विभागाच्या वतीने "अर्थशास्त्रातील रोजगार संधी"  या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विद्या प्रतिष्ठानचे कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,सुपे येथील अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.अमर नांदगुडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अर्थशास्त्र विषयातुन पदवी व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण, सहकार, बँकिंग आणि वित्तीय सेवा ,वित्तीय पत्रकारीता,संशोधन,स्पर्धा परीक्षा,आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था,इत्यादी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याचे प्रा.नांदगुडे यांनी सांगितले.अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी रोजगाराच्या संधी प्राप्त करण्यासाठी अनुषंगिक कौशल्ये प्राप्त केली पाहिजेत असे मत त्यांनी व्यक्त केले.                  ...

"ज्ञानसंवर्धिनी प्रशालेत इंटर्नशिप कोर्स प्रमाणपत्र वितरण संपन्न"

Image
शिरवळ(वार्ताहर):     ज्ञानसंवर्धिनी उच्च माध्यमिक विद्यालय, शिरवळ येथे इयत्ता अकरावी (वाणिज्य) विभागातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या व्यावसायिक शिक्षणाच्या इंटर्नशिप कोर्सचा प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न झाला. हा इंटर्नशिप कोर्स उच्च माध्यमिक विद्यालय व लेन्ड-अ-हॅन्ड इंडिया , पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला होता. इयत्ता अकरावी (वाणिज्य) मधील 18 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन प्रमाणपत्र प्राप्त केले. इंटर्नशिप कोर्समध्ये  विद्यार्थ्यांनी शिरवळ परिसरातील मेडिकल स्टोअर्स ,किराणामाल दुकान, कापड दुकान यांसारख्या विविध प्रकारच्या दुकानांमधून ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात प्रत्यक्ष काम करून व्यावसायिक शिक्षणाचे धडे प्राप्त केले. एकूण 80 तासांचे व्यावसायिक शिक्षणविषयक प्रशिक्षण या विद्यार्थ्यांनी घेतले. प्रशिक्षणादरम्यान आलेल्या विविध अनुभवांतून या विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोनाची तसेच स्वावलंबनाची वाढ होण्यास मदत झाली.         प्रमाणपत्र वितरण सोहळ्यासाठी लेन्ड-अ-हॅन्ड संस्थेचे श्री.आकाश पत्की सर, श्री. दर्शन...

"विद्या प्रतिष्ठान वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या इतिहासात नव्या पर्वाला सुरुवात : प्रा. निलेश काळदाते यांची प्राचार्यपदी नेमणूक"

Image
इंदापूर ( वार्ताहर) :         इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठानच्या वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी महाविद्यालयातील बीसीए विभाग प्रमुख प्रा. निलेश काळदाते यांची नुकतीच निवड करण्यात आली. महाविद्यालयातील कार्यरत प्राध्यापकांमधून प्राचार्यपदी निवड होणारे प्रा. काळदाते हे पहिले प्राध्यापक आहेत. विद्या प्रतिष्ठानचे वाणिज्य विज्ञान महाविद्यालय हे इंदापूर तालुक्यात बीसीएस व बीबीए अभ्यासक्रमांसाठी असणारे एकमेव महाविद्यालय आहे. महाविद्यालयात नव्याने नुकतेच बी.कॉम. व बी.एस्सी. हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेले आहेत.  .            महाविद्यालयाचे नॅक मूल्यांकन करणे तसेच महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करणे ही नवीन प्राचार्यांसमोरील आव्हाने आहेत. या निवडीबद्दल बीसीएस विभागप्रमुख प्रा.सर्फराज शेख, बीबीए विभागप्रमुख प्रा.सतीश भोंग तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. विश्वदीप न्यूज पोर्टल त्यांना भावी  कारकिर्दीसाठी शुभेच्छा ...

"आयटी क्षेत्रातील विविध मोफत कोर्सेस सेमिनारला इंदापूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद - प्रा. सुदर्शन आवटे"

Image
इंदापूर (वार्ताहर) :      विद्या प्रतिष्ठान कॉमर्स अँड सायन्स कॉलेज माजी विद्यार्थी संघटना आणि शौर्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री माननीय दत्तात्रय मामा भरणे यांचे चिरंजीव श्रीराजभैया भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि. १० डिसेंबर २०२२ रोजी आयटी क्षेत्रातील विविध कोर्सेसबाबत मोफत सेमिनार आयोजित करण्यात आले होते. रविवार  दि. ११ डिसेंबर पासून उमेदवारांनी निवडलेल्या कोर्सेसचे रजिस्ट्रेशन पूर्ण करून सोमवारपासून प्रशिक्षण चालू होईल, अशी माहिती माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुदर्शन आवटे यांनी दिली.  या सेमिनारचा उद्घाटन सोहळा शनिवार दि. १० डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ठीक ११ वाजता महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री माननीय आमदार दत्तामामा भरणे व उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री. गणेश इंगळे तसेच इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्री.तय्यब मुजावर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. या प्रशिक्षणासाठी टाटा स्ट्राइवचे सीनियर प्रोजेक्ट कॉर्डिनेटर माननीय श्री.सुबोध जाधव सर व क्षितिज जोगदंड , लीड ...

"कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य अनमोल: प्राचार्य डॉ. गौतम भोंग "

Image
चिंचवड (प्रतिनिधी):            चिंचवड येथील संघवी केशरी महाविद्यालयात २२ सप्टेंबर रोजी पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळ व सांस्कृतिक विभाग यांच्याद्वारे करण्यात आले होते. याप्रसंगी  प्राचार्य डॉ.गौतम भोंग यांनी कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन केले व आपले मनोगत व्यक्त करताना ते  म्हणाले की, "कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य अनमोल असून त्यांच्यामुळेच सर्वसामान्य लोकांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचण्यास मदत झाली".    विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. नितिन जाबरे यांनी सदर कार्यक्रमाचे संयोजन केले होते.   याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख तसेच प्राध्यापकवृंद उपस्थित होता.

‘अक्षर मानव’चा मधुमक्षिका जीवनगौरव पुरस्कार डॉ. र. पु. फडके यांना, तर ‘मधुमक्षिका जीवनसन्मान पुरस्कार’ डॉ. क. कृ. क्षीरसागर यांना प्रदान

Image
पुणे, दि. २६ - जागतिक मधुमक्षिका पालन दिनानिमित्त 'अक्षर मानव' या सामाजिक संस्थेतर्फे मधुमक्षिकापालन क्षेत्रातील आशिया खंडातील एकमेव संस्था उभी करण्यात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या डॉ.र.पु. फडके यांचा ‘मधुमक्षिका जीवन गौरव पुरस्कारा’ने तर ‘मधुमक्षिका जीवनसन्मान पुरस्कारा’ने मधमाश्यांचा प्रचार, प्रसार आणि संशोधनात भरीव कामगिरी करणाऱ्या डॉ. क. कृ. क्षीरसागर यांचा नुकताच गौरव करण्यात आला. रविवारी इंद्रधनुष्य सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते श्री. आर.आर. केडगे आणि प्रगतिशील शेतकरी व उद्योजक श्री.बच्चे पाटील यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. यावेळी अक्षर मानव मधुमक्षिकापालन विभागाचे राज्यप्रमुख प्रशांत सावंत, ज्येष्ठ नाट्यकर्मी सतीश इंदापूरकर, प्रा. प्रवीण जावळे आणि अक्षर मानव प्रशासन विभागप्रमुख सचिन पवळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा.प्रवीण जावळे यांनी अक्षर मानवची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमात ‘मधमाशीपालनातील पुढील दिशा’ या विषयावर मान्यवरांनी मतं व्यक्त केली. तसेच मधमाशीपालनाचं महत्त्वही मान्यवरांनी उलगडून सांगितले. मधमाशीपालनात अधि...

" घरगुती विद्युत उपकरणे दुरुस्ती प्रशिक्षणाचे महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्यावतीने मोफत आयोजन "

Image
            बँक ऑफ महाराष्ट्र पुरस्कृत महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था हडपसर, पुणे, यांच्यावतीने ग्रामीण तसेच निमशहरी भागातील इच्छुक नवीन उद्योजक युवक युवती स्वयं सहाय्यता बचतगट यांना आपला व्यवसाय चालू करावा यासाठी महाबँक आरसेटी मार्फत घरेलू विद्युत उपकरण उद्यामी (दुरुस्ती) या ३० दिवसीय मोफत प्रशिक्षणाची सुरुवात दिनांक ०१ एप्रिल २०२२ पासून करत आहेत. तरी इच्छुक प्रशिक्षणर्थ्यांनी नमूद तारखेस उपस्थित राहावे. प्रशिक्षणात शिकवले जाणारे विषय प्रात्यक्षिक दुरुस्ती- फ्रिज, वॉशिंग मशीन,फॅन,फिल्टर,कुलर,गिझर,मिक्सर, LED लाईट, आणि सोलर लाईट आणि इतर.        उद्योजकीय विकास प्रशिक्षण - व्यवसाय निवड,विक्री व्यवस्थापन, संभाषण कौशल्य,स्वतः बद्द्ल आत्मविश्वास,बँक कर्ज प्रस्ताव, विविध बँकिंग आणि शासकीय अनुदान योजना, विविध व्यावसायिक खेळ इ. सूचना :- 1) संपूर्ण प्रशिक्षण मोफत आहे 2)निवासाची व्यवस्था मोफत  3) नाष्टा चहा जेवण मोफत  4) प्रशिक्षण कालावधी - ०१/०४/२०२२ ते ३०/०४/२०२२ 5) वय 18 ते 45 6) मुलाखत दिनांक  : 29 मार्...