"विद्या प्रतिष्ठानच्या सुपे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर नारोळी येथे संपन्न"
सुपे (वार्ताहर) :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे,राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्या प्रतिष्ठानचे सुपे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुपे यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे नारोळी ता.बारामती येथे २ ते ८ जानेवारी २०२३ दरम्यान विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.२ जानेवारी रोजी शिबिराचे उद्घाटन झाले.उद्घाटन प्रसंगी नारोळी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. मोनाली भंडलकर,पोलीस पाटील सौ.सुजाता ढमे,उपसरपंच दत्तात्रय ढमे, ग्रामसेविका दिपाली हिरवे,न्यू इंग्लिश स्कूल नारोळीचे मुख्याध्यापक हनुमंत ढमे, महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.दत्तात्रय शिंदे,प्रा.राजेंद्र चव्हाण, प्रा.दीपक लोणकर, प्रा.अजिंक्य वाबळे, ज्ञानदेव सोनवणे ,प्राध्यापिका आरती वाबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरांतर्गत स्वयंसेवकांनी बेटी बचाओ बेटी पढाओ,मतदान हक्क, बालविवाह प्रतिबंध,स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध या विषयांवर पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली.तसेच वृक्ष संवर्धन,ग्रामस्वच्छता,प्लास्टिक संकलन,शेतकऱ्यांसाठी ई पिक पाहणी, हिमोग्लोबिन तपासणी इत्यादी उपक्रम यशस्वीरित्या पुर्ण केले. शिबीरातील स्वयंसेवकांसाठी डिजिटल मार्केटिंग, समाजसेवेतील युवकांची भूमिका, मन व्यवस्थापन व ध्यान,राष्ट्रीय सेवा योजना व व्यक्तिमत्व विकास इ. विषयांवर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. दौंड येथील वन्यजीव बचाव व पुनर्वसन करणाऱ्या रेस्क्यू टीम या स्वयंसेवी संस्थेने स्वयंसेवकांना वन्यजीवांचे बचाव व पुनर्वसन कसे करावे या संदर्भात मार्गदर्शन केले तसेच वन्यजीवन चा बचाव व पुनर्वसन कसे केले जाते यासंदर्भात शॉर्ट फिल्म दाखवून प्रबोधन केले. शिबिरातील दिनचर्येच्याप्रमाणे सकाळी विद्यार्थ्यांना योगा,व्यायाम व झुंबा नृत्याचे धडे देण्यात आले.
विद्यार्थिनींमध्ये आरती मुळीक हिला उत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये धीरज खैरे व नयन बडदे या दोघांना विभागून उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून निवडण्यात आले. शिबिराच्या समारोपाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राहुल पाटील,उपसरपंच दत्तात्रय ढमे, कार्यक्रम अधिकारी प्रा.अमर नांदगुडे कृषी सहाय्यक लोणकर साहेब, संतोष कोंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या शिबीरासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राहुल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.