"कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य अनमोल: प्राचार्य डॉ. गौतम भोंग "

चिंचवड (प्रतिनिधी): 
          चिंचवड येथील संघवी केशरी महाविद्यालयात २२ सप्टेंबर रोजी पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळ व सांस्कृतिक विभाग यांच्याद्वारे करण्यात आले होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ.गौतम भोंग यांनी कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन केले व आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, "कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य अनमोल असून त्यांच्यामुळेच सर्वसामान्य लोकांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचण्यास मदत झाली".
   विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. नितिन जाबरे यांनी सदर कार्यक्रमाचे संयोजन केले होते. 
 याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख तसेच प्राध्यापकवृंद उपस्थित होता.

Popular posts from this blog

"लोक माझे सांगाती- मा.बाळासाहेब आप्पा क्षिरसागर "

"प्रबोधनदूत योजनेच्या पुणे जिल्हा समन्वयकपदी श्री.योगेश आदलिंग यांची निवड"

" ज्ञानसंवर्धिनी प्रशालेची एस.एस.सी. परीक्षेच्या १०० % निकालाची परंपरा कायम "