" घरगुती विद्युत उपकरणे दुरुस्ती प्रशिक्षणाचे महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्यावतीने मोफत आयोजन "


           बँक ऑफ महाराष्ट्र पुरस्कृत महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था हडपसर, पुणे, यांच्यावतीने ग्रामीण तसेच निमशहरी भागातील इच्छुक नवीन उद्योजक युवक युवती स्वयं सहाय्यता बचतगट यांना आपला व्यवसाय चालू करावा यासाठी महाबँक आरसेटी मार्फत घरेलू विद्युत उपकरण उद्यामी (दुरुस्ती) या ३० दिवसीय मोफत प्रशिक्षणाची सुरुवात दिनांक ०१ एप्रिल २०२२ पासून करत आहेत. तरी इच्छुक प्रशिक्षणर्थ्यांनी नमूद तारखेस उपस्थित राहावे.

प्रशिक्षणात शिकवले जाणारे विषय प्रात्यक्षिक दुरुस्ती- फ्रिज, वॉशिंग मशीन,फॅन,फिल्टर,कुलर,गिझर,मिक्सर, LED लाईट, आणि सोलर लाईट आणि इतर.


       उद्योजकीय विकास प्रशिक्षण - व्यवसाय निवड,विक्री व्यवस्थापन, संभाषण कौशल्य,स्वतः बद्द्ल आत्मविश्वास,बँक कर्ज प्रस्ताव, विविध बँकिंग आणि शासकीय अनुदान योजना, विविध व्यावसायिक खेळ इ.

सूचना :-

1) संपूर्ण प्रशिक्षण मोफत आहे
2)निवासाची व्यवस्था मोफत 
3) नाष्टा चहा जेवण मोफत 
4) प्रशिक्षण कालावधी - ०१/०४/२०२२ ते ३०/०४/२०२२
5) वय 18 ते 45
6) मुलाखत दिनांक  : 29 मार्च  ते  31 मार्च  2022
7) मुलाखत वेळ : सकाळी  10.00 ते  सायंकाळी  5.00

पत्ता- महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी समोर हडपसर औदयोगिक वसाहत हडपसर पुणे

आवश्यक कागदपत्रे
आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड, बँकपासबुक sc, st असल्यास जातीचा दाखला (सर्व झेरॉक्स)
4 पासपोर्ट फोटो

प्रशिक्षण मौखिक आणि प्रात्यक्षिक पद्धतीने घेतले जाते तसेच क्षेत्र भेट आयोजित केली जाते
संपर्क - 9049453951,9921475741,
            8275167774, 7588565741,
            020-26821514.

टिप- प्रशिक्षण पूर्ण केल्या नंतर प्रशिक्षणार्थींना संस्थेचे तसेच केंद्र सरकार (skill India) चे प्रमाणपत्र देण्यात येईल.


Popular posts from this blog

"लोक माझे सांगाती- मा.बाळासाहेब आप्पा क्षिरसागर "

" ज्ञानसंवर्धिनी प्रशालेची एस.एस.सी. परीक्षेच्या १०० % निकालाची परंपरा कायम "

"प्रबोधनदूत योजनेच्या पुणे जिल्हा समन्वयकपदी श्री.योगेश आदलिंग यांची निवड"