"तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात अर्थशास्त्रातील रोजगार संधी या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान"


 बारामती ( वार्ताहर) : 
  दि.२७ डिसेंबर 
                 तुळजाराम चतुरचंद कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती येथे दि.२७ डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या अंतर्गत अर्थशास्त्र विभागाच्या वतीने "अर्थशास्त्रातील रोजगार संधी"  या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विद्या प्रतिष्ठानचे कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,सुपे येथील अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.अमर नांदगुडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अर्थशास्त्र विषयातुन पदवी व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण, सहकार, बँकिंग आणि वित्तीय सेवा ,वित्तीय पत्रकारीता,संशोधन,स्पर्धा परीक्षा,आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था,इत्यादी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याचे प्रा.नांदगुडे यांनी सांगितले.अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी रोजगाराच्या संधी प्राप्त करण्यासाठी अनुषंगिक कौशल्ये प्राप्त केली पाहिजेत असे मत त्यांनी व्यक्त केले. 
     
             या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.समाधान पाटील यांनी भूषविले आणि अध्यक्षीय भाषणात त्यांनी अर्थशास्त्रातील विविध रोजगार संधीचा फायदा घेण्यासाठी व्याख्यानात केलेल्या मार्गदर्शनाचा गांभीर्याने विचार करून लाभ घ्यावा असे विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ.जोतीराम घाडगे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.कृष्णा कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरूमकर उपप्राचार्य डॉ.अविनाश जगताप, डॉ.रामचंद्र सपकाळ, डॉ.सीमा नाईक गोसावी,डॉ.योगिनी मुळे, माजी विद्यार्थी संघटनेचे प्रमुख डॉ. अशोक काळंगे सर,आणि महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.

Popular posts from this blog

"सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात प्रसिद्ध भारतीय रसायनशास्त्रज्ञ सर प्रफुलचंद्र रे व इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांची जयंती उत्साहात साजरी"

"गणितातली कोडी उलगडण्यासाठी 'पाय' महत्त्वाचा : क. का. वाघ महाविद्यालयातील पाय दिन कार्यक्रमात प्रा.तुषार खैरनार यांचे प्रतिपादन"

"लोक माझे सांगाती- मा.बाळासाहेब आप्पा क्षिरसागर "