"नंदिकेश्वर प्रगती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची कृषीपुरक उद्योगांना भेट"


 सराफवाडी ( वार्ताहर):
           इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नंदिकेश्वर प्रगती विद्यालय, सराफवाडी (ता.इंदापूर) मधील इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी सराफवाडी परिसरातील कृषीपूरक उद्योगांना नुकतीच भेट दिली. पुस्तकी ज्ञानाबरोबरच विविध व्यावसायिक कौशल्ये तसेच उद्योजकीय कौशल्ये विद्यार्थ्यांना अवगत व्हावीत म्हणून या भेटीचे आयोजन केल्याचे विज्ञान शिक्षक श्री.नलवडे आर.एन. आणि श्रीमती बरळ जे.एम. यांनी सांगितले.
                          यावेळी सराफवाडी गावातील शेतकरी श्री.भारत अभंग यांच्या रेशीम उद्योग प्रकल्पाला विद्यार्थ्यांनी भेट दिली आणि रेशीम उद्योग प्रकल्प समजून घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांना तुती लागवडीपासून ते रेशीम अळीच्या वाढीच्या विविध अवस्था व त्या अवस्थांमध्ये त्यांना कशाप्रकारे खाद्य दिले जाते याविषयी सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांना घरबसल्या जोडधंदा उपलब्ध करून देणारा हा रेशीम उद्योग शेतकऱ्यांनी जरूर करावा असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी परिसरातील श्री.किसन अभंग यांच्या कुक्कुटपालन आणि पशुपालन प्रकल्पाला भेट दिली. यामध्ये विद्यार्थ्यांनी पशुपालनासाठी आवश्यक असणारी गोठ्याची रचना तसेच कुकूटपालनासाठी आवश्यक असणारी शेडची रचना यांचा अभ्यास केला.याबरोबरच पशुपालनासाठीचे चारा नियोजन आणि कुक्कुटपालनाचे खाद्याचे नियोजन याची माहिती विद्यार्थ्यांनी संबंधितांकडून घेतली.
    विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.जाधव आर.ए. हे यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान शिक्षकांनी या प्रकल्प भेटीचे आयोजन केले होते.

Popular posts from this blog

"लोक माझे सांगाती- मा.बाळासाहेब आप्पा क्षिरसागर "

" ज्ञानसंवर्धिनी प्रशालेची एस.एस.सी. परीक्षेच्या १०० % निकालाची परंपरा कायम "

"प्रबोधनदूत योजनेच्या पुणे जिल्हा समन्वयकपदी श्री.योगेश आदलिंग यांची निवड"