"विद्या प्रतिष्ठान वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या इतिहासात नव्या पर्वाला सुरुवात : प्रा. निलेश काळदाते यांची प्राचार्यपदी नेमणूक"


इंदापूर ( वार्ताहर) :
        इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठानच्या वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी महाविद्यालयातील बीसीए विभाग प्रमुख प्रा. निलेश काळदाते यांची नुकतीच निवड करण्यात आली. महाविद्यालयातील कार्यरत प्राध्यापकांमधून प्राचार्यपदी निवड होणारे प्रा. काळदाते हे पहिले प्राध्यापक आहेत. विद्या प्रतिष्ठानचे वाणिज्य विज्ञान महाविद्यालय हे इंदापूर तालुक्यात बीसीएस व बीबीए अभ्यासक्रमांसाठी असणारे एकमेव महाविद्यालय आहे. महाविद्यालयात नव्याने नुकतेच बी.कॉम. व बी.एस्सी. हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेले आहेत. 


.            महाविद्यालयाचे नॅक मूल्यांकन करणे तसेच महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करणे ही नवीन प्राचार्यांसमोरील आव्हाने आहेत. या निवडीबद्दल बीसीएस विभागप्रमुख प्रा.सर्फराज शेख, बीबीए विभागप्रमुख प्रा.सतीश भोंग तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

विश्वदीप न्यूज पोर्टल त्यांना भावी  कारकिर्दीसाठी शुभेच्छा !!
💐💐💐💐💐💐

Popular posts from this blog

"सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात प्रसिद्ध भारतीय रसायनशास्त्रज्ञ सर प्रफुलचंद्र रे व इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांची जयंती उत्साहात साजरी"

"गणितातली कोडी उलगडण्यासाठी 'पाय' महत्त्वाचा : क. का. वाघ महाविद्यालयातील पाय दिन कार्यक्रमात प्रा.तुषार खैरनार यांचे प्रतिपादन"

"लोक माझे सांगाती- मा.बाळासाहेब आप्पा क्षिरसागर "