"औक्षंण" कथेतील विचार अंमलात आणून पवार कुटुंबियांची एक नवी सुरुवात

पुणे (वार्ताहर) :
वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीला दिर्घ आयुष्य, यश, सुखसमाधान,आरोग्य मिळावे ही भावना असते. म्हणून वाढदिवसाच्या दिवशी त्यांचे औक्षंण केले जाते.अशी भावना फक्त स्त्रियांनाच नसून पुरूषांना देखील असते म्हणूनच त्यांनी देखील औक्षंण केले पाहिजे.
हा विचार सौ.सोनाली सुमित जाधव यांनी त्यांच्या "औक्षंण" कथेत मांडला आणि या नव्या विचारांचा स्विकार  
हडपसर येथील श्री.सुनील सावळाराम पवार आणि सहपरिवाराने केला आणि आपला मुलगा चि.शिवांश सुनील पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांचे औक्षंण करून एका नव्या चांगल्या रीतीची सुरूवात केली.
   फक्त वाढदिवसाच्या दिवशीच नाही तर त्या प्रत्येक शुभप्रसंगी जेव्हा स्त्रिया औक्षंण करतात तेव्हा पुरूषांनीदेखील औक्षंण केले पाहिजे.
या पवार कुटुंबियांबरोबरच परिसरातील श्री.महेशकुमार सरतापे ,श्री. दिलीप चौधरी,श्री.सुनील ठाकरे ,श्री.राहुल पाटील हा विचार अंगिकारला असून अंमलात आणला आहे.
     "औक्षंण" कथेमुळे समाजात एक नवा विचार रुजत असल्याचे मत या कथेच्या लेखिका सौ.सोनाली सुमित जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

Popular posts from this blog

"लोक माझे सांगाती- मा.बाळासाहेब आप्पा क्षिरसागर "

"प्रबोधनदूत योजनेच्या पुणे जिल्हा समन्वयकपदी श्री.योगेश आदलिंग यांची निवड"

" ज्ञानसंवर्धिनी प्रशालेची एस.एस.सी. परीक्षेच्या १०० % निकालाची परंपरा कायम "