"महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त इंदापूरमध्ये विविध सामाजिक उपक्रमांद्वारे अभिवादन"

इंदापूर (वार्ताहर):
         भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती महोत्सवानिमित्त दि. १४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथे अनोख्या पद्धतीने व्यंकटेश फार्मा वेलनेस फोरेव्हर आणि संप्रीत सुशांत किर्ते मित्रपरिवार,अंबिकानगर यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करून अभिवादन करण्यात आले.या शिबिरात ब्लड,शुगर व बीपी यांची तपासणी करण्यात आली. 

         याप्रसंगी इंदापूर तालुक्याचे लाडके आमदार माननीय दत्तात्रयमामा भरणे यांनी स्वतःचा बीपी तपासून घेत शिबिरात आपला सहभाग नोदवला.या शिबिरामध्ये फार्मासिस्ट अक्षता किर्ते,वैष्णवी साळुंखे,मिलिंद कवितके,प्राची कुचेकर,रोहित उराडे व सागर कवितके यांनी उपस्थित रूग्णांची आरोग्य तपासणी केली.सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी आरपीआयचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजीराव मखरे,भिमाई आश्रमशाळेचे सचिव ॲड.समीर मखरे,नगरसेवक अशोक मखरे सर,सुधीरशेठ मखरे,जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आनंद ऊर्फ गोट्या मखरे व सचिव शुभम मखरे यांनी सहकार्य केले.
                   हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी आरपीआयचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांनी विशेष योगदान दिले.याबरोबरच अमोल मिसाळ,चेतन रणपिसे,महेश किर्ते,यशराज लाटे,नितीन झेंडे,योगेशदादा कांबळे,सचिन कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Popular posts from this blog

"सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात प्रसिद्ध भारतीय रसायनशास्त्रज्ञ सर प्रफुलचंद्र रे व इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांची जयंती उत्साहात साजरी"

"गणितातली कोडी उलगडण्यासाठी 'पाय' महत्त्वाचा : क. का. वाघ महाविद्यालयातील पाय दिन कार्यक्रमात प्रा.तुषार खैरनार यांचे प्रतिपादन"

"लोक माझे सांगाती- मा.बाळासाहेब आप्पा क्षिरसागर "