"आयटी क्षेत्रातील विविध मोफत कोर्सेस सेमिनारला इंदापूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद - प्रा. सुदर्शन आवटे"
इंदापूर (वार्ताहर) :
विद्या प्रतिष्ठान कॉमर्स अँड सायन्स कॉलेज माजी विद्यार्थी संघटना आणि शौर्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री माननीय दत्तात्रय मामा भरणे यांचे चिरंजीव श्रीराजभैया भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि. १० डिसेंबर २०२२ रोजी आयटी क्षेत्रातील विविध कोर्सेसबाबत मोफत सेमिनार आयोजित करण्यात आले होते. रविवार दि. ११ डिसेंबर पासून उमेदवारांनी निवडलेल्या कोर्सेसचे रजिस्ट्रेशन पूर्ण करून सोमवारपासून प्रशिक्षण चालू होईल, अशी माहिती माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुदर्शन आवटे यांनी दिली.
या सेमिनारचा उद्घाटन सोहळा शनिवार दि. १० डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ठीक ११ वाजता महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री माननीय आमदार दत्तामामा भरणे व उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री. गणेश इंगळे तसेच इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्री.तय्यब मुजावर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. या प्रशिक्षणासाठी टाटा स्ट्राइवचे सीनियर प्रोजेक्ट कॉर्डिनेटर माननीय श्री.सुबोध जाधव सर व क्षितिज जोगदंड , लीड मोबिलायझेशन अँड प्लेसमेंट , टाटा स्ट्राइव यांनी कोर्सबद्दलची सर्व माहिती व प्रशिक्षणासंदर्भातील सर्व शंकांचे निरसन करून टाटा स्ट्राइव कंपनीच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांचा फायदा कसा घेता येईल, याची सविस्तर माहिती दिली व प्लेसमेंटसाठी या कोर्सेसद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये आयटी क्षेत्रात संधी मिळणार आहे असे या सेमिनार मध्ये टाटा स्ट्राइवच्या माध्यमातून सांगण्यात आले.
विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ. शिवाजी साठे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच बीसीए विभागप्रमुख प्रा. निलेश काळदाते , बीसीएस विभागप्रमुख प्रा.सरफराज शेख , बीबीए विभागप्रमुख प्रा.सतीश भोंग व शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष श्री.राहुल गुंडेकर व त्यांच्या सर्व टीमचे या कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता सहकार्य लाभले.यावेळी माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव प्रा.जावेद शेख, संचालक प्रा.तृप्ती भोंग हे उपस्थित होते.