"केतकेश्वर विद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिन आणि विज्ञान दिन उत्साहात साजरा"
निमगांव केतकी (वार्ताहर):
निमगांव केतकी येथील श्री केतकेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिन आणि विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.खान सर यांच्या प्रमुख उपस्थितीत सरस्वती प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि यावेळी महाराष्ट्रातील मराठी लोकसंस्कृती चे दर्शन घडविणारे पोवाडे,अभंग,कविता,लेझीम नृत्य, आणि विद्यार्थी व शिक्षक मनोगते अतिशय उत्साहात सादर करण्यात आले.
शिवजयंती निमित्ताने घेतलेल्या विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते श्री.के.डी. भोंग सरांनी पारितोषिके वितरित करण्यात केली.
विद्यालयातील मराठी व विज्ञान विषय शिक्षक समितीतील शिक्षकांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री.साळुंखे सर यांनी भूषविले. प्रास्ताविक श्री.राऊत सर यांनी केले, शिक्षक मनोगत सौ.खोजे मॅडम आणि श्री.खंडागळे सर यांनी केले तर सौ.माळी मॅडम यांनी सुमधुर पसायदान म्हटले तसेच सूत्रसंचालन श्री.आदलिंग सर आणि माने सर यांनी केले आणि आभार प्रदर्शन सौ.भोसले मॅडम यांनी केले.
अश्या प्रकारे विद्यालयाचे प्राचार्य,उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने अतिशय उत्साहात व आनंदात हा कार्यक्रम पार पडला.