"छत्रपती महाविद्यालयात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा"

भवानीनगर( प्रतिनिधी):
                    आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आज 21जून रोजी भवानीनगर येथील श्री छत्रपती कला, वाणिज्य महाविद्यालयात 'आंतरराष्ट्रीय योग दिन' राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ त्यांच्या वतीने  मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
           कार्यक्रमाचे प्रस्ताविक  उपप्राचार्य डॉ. संजय मोरे यांनी केले. विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.धुळदेव वाघमोडे यांनी योगाची विविध प्रात्यक्षिके विदर्थ्यांकडून करून घेतली. 
           
            महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे यांनी योग दिनाचे महत्व सांगताना म्हटले कि, प्राचीन काळापासून योगा भारतामध्ये केला जातो. भारताने जगाला योगाच्या माध्यमातून मोठी देणगी दिली आहे.आरोग्यदायी व आनंददायी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने दररोज किमान एक तास योगा व ध्यानधारणा करणं गरजेचं आहे. आजच्या धकाधकी व ताणतणावाच्या युगात आरोग्य आणि आयुर्मान वृद्धिंगत जर करायचे असेल तर याला योगाच तारू शकणार आहे. त्याकरिता योगा, ध्यानधारणा करणं खूप गरजेचं आहे.योगाचे महत्त्वं जितके जगाला कळाले तितके आपल्याला कळायला अजून वेळ लागला आहे. हे खरं तर दुर्दैव म्हणावं लागेल.आजच्या तरुणाईने गांभीर्याने पाहणं फार गरजेचे आहे. त्यासाठी योगाचा प्रचार प्रसार करणे खूप गरजेचे आहे.असे मत डॉ.प्रकाश पांढरमिसे यांनी व्यक्त केले.

           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा सुवर्णा बनसोडे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. बाबासाहेब चव्हाण यांनी मानले.यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे 104 स्वयंसेवक उपस्थित होते.
          कार्यक्रमासाठी कार्यालयीन अधीक्षक सुशील निंबाळकर तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.अतिशय उत्साहाच्या वातावरणात महाविद्यालयात योगा दिन साजरा करण्यात आला.

Popular posts from this blog

"सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात प्रसिद्ध भारतीय रसायनशास्त्रज्ञ सर प्रफुलचंद्र रे व इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांची जयंती उत्साहात साजरी"

"गणितातली कोडी उलगडण्यासाठी 'पाय' महत्त्वाचा : क. का. वाघ महाविद्यालयातील पाय दिन कार्यक्रमात प्रा.तुषार खैरनार यांचे प्रतिपादन"

"लोक माझे सांगाती- मा.बाळासाहेब आप्पा क्षिरसागर "