Posts

"प्रबोधनदूत योजनेच्या पुणे जिल्हा समन्वयकपदी श्री.योगेश आदलिंग यांची निवड"

Image
निमगांव केतकी ( वार्ताहर) :                   श्री.केतकेश्वर विद्यालय आणि जुनिअर कॉलेज येथे आज राजमाता जिजाबाई व स्वामी विवेकानंद जयंती कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपशिक्षिका सौ.साधना तावरे मॅडम होत्या . त्यांनी तसेच इतर काही शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून नुकतेच नवनीत समूहाने Tr. फॉर टीचर या कॅम्पेन अंतर्गत आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित केलेले उपशिक्षक श्री.योगेश आदलिंग सर यांची ज्ञानप्रबोधिनी, पुणे यांच्यामार्फत राबवण्यात येणाऱ्या  'प्रबोधनदूत योजनेच्या जिल्हा समन्वयकपदी नेमणूक झाल्याने त्यांचा आज या कार्यक्रम प्रसंगी उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला.        यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री.भोंग एम.बी. यांनी श्री.आदलिंग सरांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.    यावेळी पर्यवेक्षक खान सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.भोंग के.डी. ...

" राज्य सरकारतर्फे खेळाडूंच्या पुरस्काराच्या रकमेत दहापटीने वाढ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे "

Image
चंद्रपूर, दि. 27  ( वार्ताहर):                       प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त विकासाचा 11 सूत्री कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून यात क्रीडा क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. याच धर्तीवर राज्य शासनानेही खेळाला प्रथम प्राधान्य दिले आहे. याचाच एक भाग म्हणून भविष्यातील ऑलंपिक स्पर्धेत खेळाडूंना प्रेरणा मिळावी, यासाठी राज्य शासनाने खेळाडूंच्या पुरस्काराच्या रकमेत दहा पटीने वाढ केली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. बल्लारपूर (जि. चंद्रपूर) तालुका क्रीडा संकूल येथे 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. तर बल्लारपूर येथे आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात मेडल प्राप्त खेळाडू मिळतील, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2036 मध्ये ऑलंपिक स्पर्धा भारतात घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याच अनुषंगाने चंद्रपूरमधून मिशन ऑलंपिकची सुरवात झाली असून सन 2036 म...

" सुप्रसिध्द दाक्षिणात्य अभिनेता राम चरण तेजा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट "

Image
मुंबई ( वार्ताहर):          दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिध्द अभिनेता राम चरण तेजा आणि त्यांची पत्नी उपासना यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली.                यावेळी मुख्यमंत्र्यांनी रामचरण यांचे पुष्पगुच्छ आणि श्री गणेशाची मूर्ती देऊन स्वागत केले. यावेळी चित्रपट क्षेत्रासह विविध विषयांवर चर्चा झाली.         यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, सौ.वृषाली श्रीकांत शिंदे  उपस्थित होते.

" मराठीचं 'रिंगाण' समृद्ध करणारी कामगिरी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे "

Image
"साहित्य अकादमीसाठी कांदबरीकार कृष्णात खोत यांचे अभिनंदन" मुंबई, दि. २१ :                   अस्सल ग्रामीण शैली हे मराठी भाषेचे वैभव आहे. या शैलीला भारतीय साहित्य विश्वात ओळख निर्माण करून देण्याची, भारतीय साहित्य विश्र्व समृद्ध करण्याची कामगिरी कादंबरीकार कृष्णात खोत यांनी केली आहे. त्यांच्या या शैलीवर आणि प्रतिभेवर साहित्य अकादमी पुरस्काराने शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांनी 'रिंगाण' मधून मराठी साहित्याचे रिंगण समृद्ध करणारी अभिमानास्पद कामगिरी केली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कादंबरीकार कृष्णात खोत यांचे साहित्य अकादमीचा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.          'आधुनिक जगरहाटीत ग्रामीण संस्कृती आणि आपल्या गावा- गावातील बदलत्या जीवनाचं नेमकं चित्रण करण्यात श्री. खोत यांचा हातखंडा आहे. तो त्यांनी आपल्या लेखनातून अनेकदा सिद्ध केला आहे. त्यांच्या अनेक कादंबऱ्यांनी वाचकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. त्यांच्या साहित्यकृतीचा सन्मान होण्याने मराठी साहित्य क्षेत्रातील नवोदितांसाठी...

" दंगलकार नितीन चंदनशिवे 20 जानेवारी 2024 रोजी बारामती साहित्यकट्टयावर "

Image
बारामती ( वार्ताहर) :                    दंगलकार नितीनजी चंदनशिवे हे तडफदार तसेच बंडखोर विचारांचे,व्यवस्थेला प्रश्न विचारणारे कवी म्हणून आपणां सर्वांना परिचित आहेत. 'बारामती साहित्यकट्टा क्रमांक- २७' चे निमंत्रित पाहुणे म्हणून नितीनजी बारामती साहित्यकट्टावर 'माणूसकी'चा जागर करायला येत आहेत. तारीख राखीव ठेवा. प्रवेश विनामुल्य आहे. वार व दिनांक: शनिवार, २० जानेवारी २०२४ वेळ : संध्याकाळी ५ ते ७  स्थळ : कै.भिकोबा तांबे सभागृह,मेडिकोज गिल्ड,तांबेनगर,बारामती. संपर्क: श्री.शशांक मोहिते       मो.नं. 9960066966 

"मएसोच्या देशपांडे विद्यालयात रंगला ४५ वा वार्षिक क्रीडा महोत्सव"

Image
  बारामती( वार्ताहर) :              बारामती येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कै . ग. भि . देशपांडे विद्यालयात ४५ व्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन प्रमुख पाहुणे नॅशनल खेळाडू शंतनू उचाळे व आयर्नमॅन अजिंक्य साळी यांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या  मुख्याध्यापिका रोहिणी गायकवाड होत्या . यावेळी स्नेहसंमेलन अध्यक्ष नानासो केसकर, क्रीडाध्यक्ष कुमार जाधव , पर्यवेक्षक राजाराम गावडे , चंदू गवळे , शेखर जाधव , सुजाता पांडकर , विद्यार्थी क्रीडा प्रतिनिधी श्रेया गवळी व आरुष शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते .             खेळ हा खिलाडूवृत्तीने खेळून खेळभावना दाखवावी असे आवाहन करून प्रमुख अतिथी शंतनू उचाळे यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या . आई-वडिलांप्रमाणे , शिक्षक नेहमीच आपल्याला घडविण्यासाठी आत्मविश्वास देत असतात , आधारस्तंभ होवून उभे राहत असतात . त्यामुळे लहानपणापासूनच काहीतरी ध्येय निश्चित करा आणि त्या ध्येयासाठी काम करा आणि ध्येयापर्य...

"ज्ञानसंवर्धिनी प्रशालेची राज्यस्तरीय शालेय डाॅजबाॅल स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी"

Image
शिरवळ ( वार्ताहर) :   क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र व लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,लातूर तसेच महाराष्ट्र डॉट बॉल संघटना यांच्या वतीने दिनांक नऊ ते अकरा डिसेंबर 2023 दरम्यान उदगीर ( जि. लातूर ) या ठिकाणी आयोजित राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेमध्ये शिरवळ(जि.सातारा) येथील ज्ञानसंवर्धिनी माध्यमिक विद्यालयाच्या 17 वर्षाखालील मुलींच्या संघाने चमकदार कामगिरी करत तृतीय क्रमांक मिळविला.जिल्हास्तर तसेच विभाग स्तरावर अव्वल कामगिरी करून राज्यस्तरावर शालेय स्पर्धेमध्ये मजल मारणारा प्रशालेतील हा पहिलाच संघ आहे.या संघातील कु.संस्कृती गाडगे व कु.समृद्धी नेवसे यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. तसेच, मुलांच्या संघातून चि.ऋतुराज माने याची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे .     मुलींच्या संघांमध्ये संस्कृती घाडगे, समृद्धी नेवसे,अनुष्का कांबळे, साक्षी धनवडे, गायत्री देवरासे, सृष्टी नेवसे,तन्वी जगताप,संस्कृती सोमवंशी,प्रज्ञा तळेकर व अनुजा चव्हाण या विद्यार्थिनींचा समावेश होता.या स्पर्धेसाठी त्यांना क्रीडाशिक्षक सौ.भंडलक...

काव्यमंच - आजची कविता " शाळेची ओढ " कवी : साहेबराव शिंदे

Image

'ॲमेझिंग २०००' स्नेहसंमेलनाचे दि.१९ नोव्हेंबर रोजी आयोजन

Image
निमगांव केतकी (वार्ताहर):             आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देण्यासाठी,तसेच ते शालेय जीवनातील सुंदर असे दिवस पुन्हा जगण्यासाठी निमगांव केतकी येथील श्री केतकेश्वर विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या सन २००० या बॅचचे विद्यार्थी पुन्हा एकदा तब्बल २३ वर्षानंतर एकत्र येत आहेत. या बॅचच्या संयोजन समितीने यासाठी ' ॲमेझिंग २०००'   या   स्नेहसंमेलनाचे आयोजन केलेले आहे .        विद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शालेय जीवनाला उजाळा देण्याची संधी या निमित्ताने प्राप्त होत आहे. तरी इयत्ता १० वीच्या सन २००० या बॅचच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी १९ नोव्हेंबरला अगदी न विसरता येऊन पुन्हा एकदा शालेय आठवणीत रमण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.हा समारंभ इंदापूर येथील राधिका हॉल या ठिकाणी रविवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.           त्यापूर्वी सकाळी ठीक आठ वाजता सर्व माजी विद्यार्थ्यांनी श्री केतकेश्वर विद्यालया...

" सुभाष बाबूराव कुल महाविद्यालयात भित्तिपत्रक प्रदर्शन स्पर्धेला उदंड प्रतिसाद "

Image
केडगाव ( वार्ताहर) :         केडगांव (ता.दौंड) येथील सुभाष बाबूराव कुल महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाने भित्तिपत्रक प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेच्या उदघाटनासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नंदकुमार जाधव उपस्थित होते.प्राचार्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना अर्थशास्त्रातील संकल्पना अवगत होण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची खोली वाढविण्यासाठी हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले.या उपक्रमात वाणिज्य आणि बी.ए. व एम.ए.अर्थशास्त्र विभागातील 150 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.तन्वीर शेख,मराठी विभागप्रमुख डॉ.बी.डी.गव्हाणे, कला शाखाप्रमुख डॉ.अनुराधा गुजर, भूगोल विभागप्रमुख डॉ.अशोक दिवेकर, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.भाऊसाहेब दरेकर,अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.महादेव थोपटे डॉ. शोभा वाईकर,ग्रंथपाल डॉ.मनीषा जाधव,विज्ञान शाखाप्रमुख प्रा.अरविंद मिंधे इ.मान्यवर उपस्थित होते.      या स्पर्धेचे परीक्षण डॉ.भाऊसाहेब दरे...

" प्रात्यक्षिकातून दिले जात आहेत गणिताचे धडे - नंदिकेश्वर प्रगती विद्यालयाचा अभिनव उपक्रम "

Image
सराफवाडी ( वार्ताहर):       इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नंदिकेश्वर प्रगती विद्यालय,सराफवाडी शाळेमध्ये नेहमीच विविध अभिनव उपक्रम राबवले जातात. गणितासारख्या विषयातील काही भौमितिक भागांचे विद्यार्थ्यांना सहजरीत्या आकलन व्हावे म्हणून गणित शिक्षक श्री.नलवडे आर.एन. यांनी याकरता एक अभिनव संकल्पना अमलात आणली. त्यांनी शाळेच्या मैदानावरती विद्यार्थ्यांना भौमितिक संकल्पना समजावून दिल्या . त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे कोणतेही दडपण न येता संकल्पना उत्तमरित्या समजून हसत खेळत शिक्षण पार पडले.  संस्थेचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी पाटीलसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा नेहमीच वेगवेगळे अभिनव उपक्रम राबवत असते. या प्रात्यक्षिकावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.शिंगाडे जे.एन.,श्री.काळेल ए.के.,विज्ञान शिक्षिका श्रीमती बरळ जे.एम.,श्रीमती पाकले एस.बी. हे उपस्थित होते.

" गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन आपल्यातील सामाजिक भान जपणे गरजेचे " - डॉ.श्रीराम गीत

Image
पुणे ( वार्ताहर):                  "दहावी बारावीचा टप्पा पार करून करिअरमध्ये यशस्वी झाल्यावर विद्यार्थ्यांनी इतर गरजू विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात देऊन आपल्यातील सामाजिक भान जपणे गरजेचे आहे " ,असे उद्गार सुप्रसिद्ध करियर कौन्सिलर डॉ. श्रीराम गीत यांनी काढले.             जागृती महिला व बालकल्याण संस्थेने आयोजित केलेल्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात उपस्थित विद्यार्थी व पालकांना ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करतेवेळी ते बोलत होते. दहावी, बारावीच्या वळणावरून आपल्या करिअरच्या वाटेवर विद्यार्थी कुठल्याही क्षेत्रात यशस्वी झाला, तरी त्यांनी आपल्या अवतीभवती जिथे कुठे विद्यार्थ्यांसाठी मदतीची गरज भासेल तिथे आवश्यक मदत करावी असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनाच्या वेळी विद्यार्थ्यांना सांगितले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जागृती महिला व बालकल्याण संस्थेच्या वतीने दहावी आणि बारावीतील 80% च्या वर मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.      ...

"ज्ञानसंवर्धिनी माध्यमिक विद्यालयात जागतिक युवा कौशल्य दिन साजरा"

Image
शिरवळ (वार्ताहर):              ज्ञानसंवर्धिनी माध्यमिक विद्यालय , शिरवळ येथे बुधवार दिनांक १९/ ७ /२०२३ रोजी जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त शाळेतील मल्टीस्किल अभ्यासक्रमाच्या चारही विभागाशी सबंधित विद्यार्थांच्याकडून रांगोळी काढण्यात आली तसेच विभागात बनवण्यात आलेल्या वस्तूंचे प्रदर्शन शाळेतील इतर विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी ठेवण्यात आले होते . शाळेतील विद्यार्थ्यांनी मल्टीस्कील विभागात बनवलेल्या वस्तूंची पाहणी केली.              जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी औरा लेझर कंपनीचे सिनिअर इंजिनिअर मा.साहिल आतार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते . आतार सर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वप्ने पहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्त्न करावेत . वेळीच निर्माण होणाऱ्या समस्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सहाय्याने सोडवाव्यात म्हणजे पुढे येणाऱ्या अडचणीवर मात करता येईल.    ...

" श्री.खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात प्लास्टिक मुक्ती अभियान "

Image
अंबाजोगाई (प्रतिनिधी) :         'वसुधैव कुटुम्बकम्' या विचारांचा वारसा सांगणारी आपली भारतीय संस्कृती विश्व कल्याणासाठी नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे, याच विश्व कल्याणासाठी, वसुंधरेच्या संवर्धनासाठी अत्यंत धोकादायक असणाऱ्या प्लास्टिकला हद्दपार करून पुन्हा एकदा पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी 'प्लास्टिक मुक्ती ही काळाची गरज आहे ' त्यामुळे येथील श्री.खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात आयोजित प्लास्टिक मुक्त अभियानात विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत.   या अभियाना अंतर्गत प्लॅस्टिक मुक्त परिसर करण्यासाठी संकल्प केला असून आठवडाभरात घर,शाळा परिसरात असलेले टाकावू प्लास्टिक दर शनिवारी  विद्यालयात जमा करून नंतर ते नगर परिषद अंबाजोगाई येथे जमा केले जाणार आहे.आज विद्यालयात विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिक बॉटल मध्ये जमा करून दिले. या उपक्रमाचे प्रमुख व प्रबोधन दूत श्रीकांत देशपांडे काम पहात आहेत विद्यालयात मा मुख्याध्यापक श्री बाबुराव आडे सरांनी विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षक म्हणून काम करताना वृक्षारोपण करून वृक्ष जगवण्याचे कार्य सातत्याने करावे तसेच पर्यावरणाला ...

"छत्रपती महाविद्यालयात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा"

Image
भवानीनगर( प्रतिनिधी):                     आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आज 21जून रोजी भवानीनगर येथील श्री छत्रपती कला, वाणिज्य महाविद्यालयात 'आंतरराष्ट्रीय योग दिन' राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ त्यांच्या वतीने  मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.            कार्यक्रमाचे प्रस्ताविक  उपप्राचार्य डॉ. संजय मोरे यांनी केले. विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.धुळदेव वाघमोडे यांनी योगाची विविध प्रात्यक्षिके विदर्थ्यांकडून करून घेतली.                          महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे यांनी योग दिनाचे महत्व सांगताना म्हटले कि, प्राचीन काळापासून योगा भारतामध्ये केला जातो. भारताने जगाला योगाच्या माध्यमातून मोठी देणगी दिली आहे.आरोग्यदायी व आनंददायी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने दररोज किमान एक तास योगा व ध्यानधारणा करणं गरजेचं आहे. आजच्या धकाधकी व ताणतणावाच्या युगात आरोग्य आणि आयुर्मान वृद्धिंगत जर क...