" श्री.खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात प्लास्टिक मुक्ती अभियान "

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :
        'वसुधैव कुटुम्बकम्' या विचारांचा वारसा सांगणारी आपली भारतीय संस्कृती विश्व कल्याणासाठी नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे, याच विश्व कल्याणासाठी, वसुंधरेच्या संवर्धनासाठी अत्यंत धोकादायक असणाऱ्या प्लास्टिकला हद्दपार करून पुन्हा एकदा पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी 'प्लास्टिक मुक्ती ही काळाची गरज आहे ' त्यामुळे येथील श्री.खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात आयोजित प्लास्टिक मुक्त अभियानात विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत.
  या अभियाना अंतर्गत प्लॅस्टिक मुक्त परिसर करण्यासाठी संकल्प केला असून आठवडाभरात घर,शाळा परिसरात असलेले टाकावू प्लास्टिक दर शनिवारी  विद्यालयात जमा करून नंतर ते नगर परिषद अंबाजोगाई येथे जमा केले जाणार आहे.आज विद्यालयात विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिक बॉटल मध्ये जमा करून दिले. या उपक्रमाचे प्रमुख व प्रबोधन दूत श्रीकांत देशपांडे काम पहात आहेत विद्यालयात मा मुख्याध्यापक श्री बाबुराव आडे सरांनी विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षक म्हणून काम करताना वृक्षारोपण करून वृक्ष जगवण्याचे कार्य सातत्याने करावे तसेच पर्यावरणाला प्लॅस्टिक घातक आहे त्यामुळे परिसरातील प्लॅस्टिक विद्यालयात जमा करून उपक्रमात सहभागी व्हावे व प्लॅस्टिक मुक्त करण्यासाठी प्रचार करा व प्रत्यक्ष कृती करा असे आवाहन केले.
  याप्रसंगी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा मुख्याध्यापक श्री.बाबुराव आडे सर, उपमुख्याध्यापक श्री.शंकर वाघमारे सर,पर्यवेक्षक श्री.अरूण पत्की सर, विभाग प्रमुख श्री.प्रशांत पिंपळे सर , अभ्यासपूरक मंडळ प्रमुख सौ.सुरेखा काळे मॅडम, अभियान प्रमुख श्री.श्रीकांत देशपांडे सर,श्री.शैलेंद्र कंगळे सर तसेच सर्व शिक्षक बंधु -भगीनी ,  कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.

Popular posts from this blog

"सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात प्रसिद्ध भारतीय रसायनशास्त्रज्ञ सर प्रफुलचंद्र रे व इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांची जयंती उत्साहात साजरी"

"गणितातली कोडी उलगडण्यासाठी 'पाय' महत्त्वाचा : क. का. वाघ महाविद्यालयातील पाय दिन कार्यक्रमात प्रा.तुषार खैरनार यांचे प्रतिपादन"

"लोक माझे सांगाती- मा.बाळासाहेब आप्पा क्षिरसागर "