" सुप्रसिध्द दाक्षिणात्य अभिनेता राम चरण तेजा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट "
मुंबई ( वार्ताहर):
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिध्द अभिनेता राम चरण तेजा आणि त्यांची पत्नी उपासना यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी रामचरण यांचे पुष्पगुच्छ आणि श्री गणेशाची मूर्ती देऊन स्वागत केले. यावेळी चित्रपट क्षेत्रासह विविध विषयांवर चर्चा झाली.
यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, सौ.वृषाली श्रीकांत शिंदे उपस्थित होते.