"ज्ञानसंवर्धिनी माध्यमिक विद्यालयात जागतिक युवा कौशल्य दिन साजरा"
शिरवळ (वार्ताहर):
ज्ञानसंवर्धिनी माध्यमिक विद्यालय , शिरवळ येथे बुधवार दिनांक १९/ ७ /२०२३ रोजी जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त शाळेतील मल्टीस्किल अभ्यासक्रमाच्या चारही विभागाशी सबंधित विद्यार्थांच्याकडून रांगोळी काढण्यात आली तसेच विभागात बनवण्यात आलेल्या वस्तूंचे प्रदर्शन शाळेतील इतर विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी ठेवण्यात आले होते . शाळेतील विद्यार्थ्यांनी मल्टीस्कील विभागात बनवलेल्या वस्तूंची पाहणी केली.
जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी औरा लेझर कंपनीचे सिनिअर इंजिनिअर मा.साहिल आतार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते . आतार सर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वप्ने पहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्त्न करावेत . वेळीच निर्माण होणाऱ्या समस्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सहाय्याने सोडवाव्यात म्हणजे पुढे येणाऱ्या अडचणीवर मात करता येईल.
शाळेत मल्टीस्कील विभाग असल्यामुळे वियार्थ्याना स्वतःच्या कल्पना शक्तीचा वापर करून वेगवेगळ्या वस्तू बनवता येतात. स्वतः हाताने काम करण्याची सवय लागते. प्रत्यक्ष अनुभवातून शिकता येते . खरच मल्टीस्कील हा उपक्रम प्रत्येक विद्यार्थ्याला जीवनाची दिशा ठरवण्यासाठी खूप उपयोगी ठरत आहे असे आतार सरांनी विद्यार्थ्याना सागितले . भविष्यात या व्यवसाईक अभ्यासक्रमामुळे येणाऱ्या पिढीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उद्योजक तरी होतील.उद्योजकता वाढली तर बेरोजगारी कमी होईल. त्यामुळे गावाची, जिल्ह्याची, राज्याची व देशाची प्रगती होईल . त्यामुळे देशाचा विकास होईल. त्यामुळे हल्लीचे शिक्षण व्यवसाईक आवड निर्माण करणारे असले पाहिजे . लाही या संस्थेच्या सहकार्यामुळे आपल्या शाळेतील व्यवसाय अभ्यासक्रम खुप सुंदर पद्धतीने चालवला जात आहे.त्याबद्दल लाही या संस्थेचे आभार आतार सरांनी मानले.
हा उपक्रम ज्ञानसंवर्धिनी शिक्षण संस्थेचे सचिव श्री.रमेश देशपांडे सर तसेच लाही संस्थेचे सातारा जिल्हा प्रकल्प समन्वयक श्री.मयुर लाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
या कार्यक्रमासाठी ज्ञानसंवर्धिनी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. क्षीरसागर मॅडम, औरा लेझर कंपनीचे सिनिअर इंजिनिर मा.साहिल आतार, समन्वयक श्री.गाढवे सर , निदेशक श्री.कोकरे सर, श्री. नाळे सर , कोळेकर सर , सौ.गायकवाड मॅडम उपस्थित होते.