" सुभाष बाबूराव कुल महाविद्यालयात भित्तिपत्रक प्रदर्शन स्पर्धेला उदंड प्रतिसाद "


केडगाव ( वार्ताहर) :
        केडगांव (ता.दौंड) येथील सुभाष बाबूराव कुल महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाने भित्तिपत्रक प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेच्या उदघाटनासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नंदकुमार जाधव उपस्थित होते.प्राचार्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना अर्थशास्त्रातील संकल्पना अवगत होण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची खोली वाढविण्यासाठी हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले.या उपक्रमात वाणिज्य आणि बी.ए. व एम.ए.अर्थशास्त्र विभागातील 150 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.तन्वीर शेख,मराठी विभागप्रमुख डॉ.बी.डी.गव्हाणे, कला शाखाप्रमुख डॉ.अनुराधा गुजर, भूगोल विभागप्रमुख डॉ.अशोक दिवेकर, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.भाऊसाहेब दरेकर,अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.महादेव थोपटे डॉ. शोभा वाईकर,ग्रंथपाल डॉ.मनीषा जाधव,विज्ञान शाखाप्रमुख प्रा.अरविंद मिंधे इ.मान्यवर उपस्थित होते. 

    या स्पर्धेचे परीक्षण डॉ.भाऊसाहेब दरेकर, डॉ.बी.डी. गव्हाणे, प्रा.शुभम ताकवणे,डॉ. गोपाळ भोसले, प्रा.चैत्राली म्हस्के यांनी केले. स्पर्धेच्या आयोजनासाठी अर्थशास्त्र विभागातील डॉ.श्याम वासनीकर, प्रा.अमर नांदगुडे आणि प्रा.गणेश गायकवाड यांनी समन्वयकाची भूमिका बजावली. त्यांना अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. महादेव थोपटे यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ.विशाल गायकवाड तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी,उपस्थित विद्यार्थी या सर्वांचे सहकार्य लाभले.

Popular posts from this blog

"मएसोच्या देशपांडे विद्यालयात रंगला ४५ वा वार्षिक क्रीडा महोत्सव"

"प्रबोधनदूत योजनेच्या पुणे जिल्हा समन्वयकपदी श्री.योगेश आदलिंग यांची निवड"

"ज्ञानसंवर्धिनी प्रशालेची राज्यस्तरीय शालेय डाॅजबाॅल स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी"