" प्रात्यक्षिकातून दिले जात आहेत गणिताचे धडे - नंदिकेश्वर प्रगती विद्यालयाचा अभिनव उपक्रम "

सराफवाडी ( वार्ताहर):
      इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नंदिकेश्वर प्रगती विद्यालय,सराफवाडी शाळेमध्ये नेहमीच विविध अभिनव उपक्रम राबवले जातात. गणितासारख्या विषयातील काही भौमितिक भागांचे विद्यार्थ्यांना सहजरीत्या आकलन व्हावे म्हणून गणित शिक्षक श्री.नलवडे आर.एन. यांनी याकरता एक अभिनव संकल्पना अमलात आणली. त्यांनी शाळेच्या मैदानावरती विद्यार्थ्यांना भौमितिक संकल्पना समजावून दिल्या . त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे कोणतेही दडपण न येता संकल्पना उत्तमरित्या समजून हसत खेळत शिक्षण पार पडले.
 संस्थेचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी पाटीलसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा नेहमीच वेगवेगळे अभिनव उपक्रम राबवत असते. या प्रात्यक्षिकावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.शिंगाडे जे.एन.,श्री.काळेल ए.के.,विज्ञान शिक्षिका श्रीमती बरळ जे.एम.,श्रीमती पाकले एस.बी. हे उपस्थित होते.

Popular posts from this blog

"सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात प्रसिद्ध भारतीय रसायनशास्त्रज्ञ सर प्रफुलचंद्र रे व इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांची जयंती उत्साहात साजरी"

"गणितातली कोडी उलगडण्यासाठी 'पाय' महत्त्वाचा : क. का. वाघ महाविद्यालयातील पाय दिन कार्यक्रमात प्रा.तुषार खैरनार यांचे प्रतिपादन"

"लोक माझे सांगाती- मा.बाळासाहेब आप्पा क्षिरसागर "