'ॲमेझिंग २०००' स्नेहसंमेलनाचे दि.१९ नोव्हेंबर रोजी आयोजन
निमगांव केतकी (वार्ताहर):
आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देण्यासाठी,तसेच ते शालेय जीवनातील सुंदर असे दिवस पुन्हा जगण्यासाठी निमगांव केतकी येथील श्री केतकेश्वर विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या सन २००० या बॅचचे विद्यार्थी पुन्हा एकदा तब्बल २३ वर्षानंतर एकत्र येत आहेत. या बॅचच्या संयोजन समितीने यासाठी 'ॲमेझिंग २०००' या स्नेहसंमेलनाचे आयोजन केलेले आहे . विद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शालेय जीवनाला उजाळा देण्याची संधी या निमित्ताने प्राप्त होत आहे.
तरी इयत्ता १० वीच्या सन २००० या बॅचच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी १९ नोव्हेंबरला अगदी न विसरता येऊन पुन्हा एकदा शालेय आठवणीत रमण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.हा समारंभ इंदापूर येथील राधिका हॉल या ठिकाणी रविवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
त्यापूर्वी सकाळी ठीक आठ वाजता सर्व माजी विद्यार्थ्यांनी श्री केतकेश्वर विद्यालयाच्या पटांगणात एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.