"लोक माझे सांगाती- मा.बाळासाहेब आप्पा क्षिरसागर "
#लोक_माझे_सांगाती- मा.बाळासाहेब आप्पा क्षिरसागर
नाशिक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे आणि लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती बाळासाहेब रामनाथ क्षिरसागर यांचा शनिवार दि २८ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे त्यानिमित्त निफाड येथील कर्मवीर गणपत दादा मोरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सकाळी १० ते दु २ वा पर्यंत सर्वांसाठी मोफत सर्वरोगनिदान शिबीराचे रक्तदान शिबिराचे आणि क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे यानिमित्त बाळासाहेब क्षिरसागर यांच्या राजकिय सामाजिक कार्यावर टाकलेला प्रकाशझोत ..
निफाड तालुक्याच्या राजकारणात लोकनेते स्व आर डी आप्पा क्षिरसागर यांनी वेगळा दबदबा निर्माण केलेला होता जिल्हा भुविकास बँकेच्या माध्यामातुन जिल्हाभरात शेतकर्यांच्या घामाला आधार दिला पुढील काळात बाळासाहेब क्षीरसागरांना राजकिय सामाजिक वारसा मिळाला असल्याने सर्वच क्षेत्रातील नागरिकांशि बाळासाहेबांचा संबंध येत गेला
महाविद्यालयीन शिक्षण पिंपळगाव बसवंतला पुर्ण केल्यावर बाळासाहेब द्राक्ष शेतीत रममाण झाले होते नवनविन प्रयोग करुन द्राक्षशेती वाढविलि 1997 च्या सुमारास द्राक्ष बागायतदार संघाच्या नाशिक विभागीय मानद सचिवपदी निवड झाली अन राजकिय प्रवास सुरु झाला सोसायटी चेअरमन पदाची धुराही यशस्वीपणे सांभाळली द्राक्ष बागायतदार संघाच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदावर त्यांनी कामकाज केले शिवडी सोसायटीत गेल्या पंधरा विस वर्षापासुन त्यांची एकहाती सत्ता आहे निफाड शेतकरी सहकारी संघातही संचालक म्हणुन बाळासाहेब क्षिरसागर यांनी कामकाज केले आहे लासलगांव कृषि उत्पन्न बाजार समितीचे ते सलग पंधरा वर्षापासुन संचालक आहेत तसेच उपसभापती पदही भुषविले आहे.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघावरही संचालक म्हणुन त्यांनी कामकाज केले मुक्ताई को आँप बँकेची स्थापना करत जनसामन्यांसाठी आर्थिक आधार उभा केला बँकेचे लोकनेते आर डी आप्पा क्षीरसागर को आँप बँक असे नामकरण आप्पांच्या पुण्यस्मरणानिमित्त केले शिवसेनेसोबत सलग तीन पंचवार्षिक निवडणुकीत बाळासाहेबांनी आपले नाते गोते कार्यकर्ते उभे केले या राजकिय पाठबळातुनच पुढे बाळासाहेब क्षीरसागरांनी भगवा खांद्यावर घेतला शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी थेट संपर्क आला 2017 मध्ये जिल्हा परिषदेत नव्यानेच अस्तित्वात आलेल्या उगांव जिल्हा परिषद गटात त्यांना शिवसेनेची उमेदवारी घोषित झाली नविन उगांव गटाचे पहिले सदस्य बनले
प्रथम राजकिय घडामोडीत त्यांना एखाद्या समितीवर काम करण्याची संधी मिळालि नव्हती मात्र देर आये दुरुस्त आये या म्हणीचा पुरेपुर प्रत्यय आला शिवसेना जिल्हा परिषद गटनेतेपदी बाळासाहेब क्षीरसागरांची निवड झाली अध्यक्षपद सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षित झाले त्यात अध्यक्षपदासाठी बाळासाहेब क्षीरसागरांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच त्यांचे मायभुमित शिवडीकरांसह कुटुंबियांचा आनंद ओसंडुन वाहीला अवघ्या तीन साडेतीन हजार लोकवस्तीच्या गावाला थेट जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला असल्याने गावासह तालुकाभर शिवसेनेचे कार्यकर्ते अन क्षीरसागरांच्या नात्यागोत्यात एक सुखद आनंदाची लकेर उमटली होती आपल्या अध्यक्षपदाची कारकिर्द कोरोनासारख्या आपत्तीत रक्षणासाठी घातली आहे शिवाय जिल्हाभरात शिक्षण आरोग्य अन पायाभुत सुविधांवरही विशेष लक्ष घालुन नेत्रदिपक काम केले आहे
नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळ या राज्यातील दुसर्या क्रमांकाच्या अग्रगण्य शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत बाळासाहेब क्षिरसागर यांनी पँनलनिर्मितीपासुनच उडी घेतली सभापती पदासाठी उमेदवारी करतांना पँनलच्या पारड्यात आपले कार्यकर्ते,नातीगोती या सर्वांचेच वजन टाकले आजवरचा मविप्रचा बालेकिल्ला काबीज करत क्षीरसागर ठाकरेंच्या नेतृत्वाला झळाळी लाभली आहे शिवसेनेसारख्या पक्षात असुनही मितभाषी नेता म्हणुन त्यांची ख्याती आहे सुभाष व संजय हे बंधु आई इंदुबाई पत्नी मुक्ताबाई भावजय मुलगा पुतणे अशा एकत्रित कुटुंबात रममाण होणारे बाळासाहेब कुटुंबवत्सल आहेतच शिवाय धार्मिक सामाजिक कार्यातही ते नियमितपणे तन मन धनाने सहभागी होतातच शिवडीचा नेता थेट जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर विराजमान होतो काय अन त्यानंतर लगेचच मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सभापती पदावर विराजमान होऊन सामान्यांसाठी झोकुन काम करतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे बाळासाहेब क्षीरसागर होय बाळासाहेब आप्पा क्षीरसागरांची पुढील राजकिय घोडदौड अधिक व्यापक होण्यासाठी वाढदिवसाच्या मनपुर्वक शुभेच्छा!
प्रा.श्री.सचिन कुशारे,
मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मवीर ॲड. बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय, नाशिक..