"मएसोच्या देशपांडे विद्यालयात रंगला ४५ वा वार्षिक क्रीडा महोत्सव"
बारामती( वार्ताहर) :
बारामती येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कै . ग. भि . देशपांडे विद्यालयात ४५ व्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन प्रमुख पाहुणे नॅशनल खेळाडू शंतनू उचाळे व आयर्नमॅन अजिंक्य साळी यांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोहिणी गायकवाड होत्या . यावेळी स्नेहसंमेलन अध्यक्ष नानासो केसकर, क्रीडाध्यक्ष कुमार जाधव , पर्यवेक्षक राजाराम गावडे , चंदू गवळे , शेखर जाधव , सुजाता पांडकर , विद्यार्थी क्रीडा प्रतिनिधी श्रेया गवळी व आरुष शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते .
खेळ हा खिलाडूवृत्तीने खेळून खेळभावना दाखवावी असे आवाहन करून प्रमुख अतिथी शंतनू उचाळे यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या . आई-वडिलांप्रमाणे , शिक्षक नेहमीच आपल्याला घडविण्यासाठी आत्मविश्वास देत असतात , आधारस्तंभ होवून उभे राहत असतात . त्यामुळे लहानपणापासूनच काहीतरी ध्येय निश्चित करा आणि त्या ध्येयासाठी काम करा आणि ध्येयापर्यंत लढा असे विचार मनोगतातून अजिंक्य साळी सर यांनी व्यक्त केले . आजच्या विद्यार्थ्यांनी मोबाईल सोडून मैदानावर आले पाहिजे . उत्तम आरोग्य हेच आपले खरे धन असते म्हणून व्यायामाला आणि खेळाला सुद्धा महत्व द्यावे असे आवाहन अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका रोहिणी गायकवाड यांनी खेळाडूंना केले . या क्रीडा महोत्सवात वैयक्तिक प्रकारात २०० , ४०० , ८०० मीटर रनिंग , क्रॉसकंट्री , लांब उडी , गोळा फेक, तर सांघिक प्रकारात डॉजबॉल, कबड्डी, खो-खो या क्रीडा प्रकारांचा समावेश होता .
या क्रीडा महोत्सवाचे नियोजन क्रीडा शिक्षक अनिल गावडे , दादासाहेब शिंदे , बाळासो अभंग आदी क्रीडा शिक्षकांनी उत्तमरीत्या केले . हा कार्यक्रम संस्थेचे नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, नियामक मंडळाचे सदस्य राजीवजी देशपांडे, शाळा समन्वयक पुरुषोत्तम कुलकर्णी, सल्लागार समिती सदस्य फणेंद्र गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमार जाधव यांनी केले. सूत्रसंचालन शंकरराव घोडे यांनी केले व आभार गणपत जाधव यांनी मानले .