Posts

"तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात अर्थशास्त्रातील रोजगार संधी या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान"

Image
 बारामती ( वार्ताहर) :    दि.२७ डिसेंबर                   तुळजाराम चतुरचंद कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती येथे दि.२७ डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या अंतर्गत अर्थशास्त्र विभागाच्या वतीने "अर्थशास्त्रातील रोजगार संधी"  या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विद्या प्रतिष्ठानचे कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,सुपे येथील अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.अमर नांदगुडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अर्थशास्त्र विषयातुन पदवी व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण, सहकार, बँकिंग आणि वित्तीय सेवा ,वित्तीय पत्रकारीता,संशोधन,स्पर्धा परीक्षा,आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था,इत्यादी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याचे प्रा.नांदगुडे यांनी सांगितले.अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी रोजगाराच्या संधी प्राप्त करण्यासाठी अनुषंगिक कौशल्ये प्राप्त केली पाहिजेत असे मत त्यांनी व्यक्त केले.                  ...

"ज्ञानसंवर्धिनी प्रशालेत इंटर्नशिप कोर्स प्रमाणपत्र वितरण संपन्न"

Image
शिरवळ(वार्ताहर):     ज्ञानसंवर्धिनी उच्च माध्यमिक विद्यालय, शिरवळ येथे इयत्ता अकरावी (वाणिज्य) विभागातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या व्यावसायिक शिक्षणाच्या इंटर्नशिप कोर्सचा प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न झाला. हा इंटर्नशिप कोर्स उच्च माध्यमिक विद्यालय व लेन्ड-अ-हॅन्ड इंडिया , पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला होता. इयत्ता अकरावी (वाणिज्य) मधील 18 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन प्रमाणपत्र प्राप्त केले. इंटर्नशिप कोर्समध्ये  विद्यार्थ्यांनी शिरवळ परिसरातील मेडिकल स्टोअर्स ,किराणामाल दुकान, कापड दुकान यांसारख्या विविध प्रकारच्या दुकानांमधून ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात प्रत्यक्ष काम करून व्यावसायिक शिक्षणाचे धडे प्राप्त केले. एकूण 80 तासांचे व्यावसायिक शिक्षणविषयक प्रशिक्षण या विद्यार्थ्यांनी घेतले. प्रशिक्षणादरम्यान आलेल्या विविध अनुभवांतून या विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोनाची तसेच स्वावलंबनाची वाढ होण्यास मदत झाली.         प्रमाणपत्र वितरण सोहळ्यासाठी लेन्ड-अ-हॅन्ड संस्थेचे श्री.आकाश पत्की सर, श्री. दर्शन...

"विद्या प्रतिष्ठान वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या इतिहासात नव्या पर्वाला सुरुवात : प्रा. निलेश काळदाते यांची प्राचार्यपदी नेमणूक"

Image
इंदापूर ( वार्ताहर) :         इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठानच्या वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी महाविद्यालयातील बीसीए विभाग प्रमुख प्रा. निलेश काळदाते यांची नुकतीच निवड करण्यात आली. महाविद्यालयातील कार्यरत प्राध्यापकांमधून प्राचार्यपदी निवड होणारे प्रा. काळदाते हे पहिले प्राध्यापक आहेत. विद्या प्रतिष्ठानचे वाणिज्य विज्ञान महाविद्यालय हे इंदापूर तालुक्यात बीसीएस व बीबीए अभ्यासक्रमांसाठी असणारे एकमेव महाविद्यालय आहे. महाविद्यालयात नव्याने नुकतेच बी.कॉम. व बी.एस्सी. हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेले आहेत.  .            महाविद्यालयाचे नॅक मूल्यांकन करणे तसेच महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करणे ही नवीन प्राचार्यांसमोरील आव्हाने आहेत. या निवडीबद्दल बीसीएस विभागप्रमुख प्रा.सर्फराज शेख, बीबीए विभागप्रमुख प्रा.सतीश भोंग तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. विश्वदीप न्यूज पोर्टल त्यांना भावी  कारकिर्दीसाठी शुभेच्छा ...

"आयटी क्षेत्रातील विविध मोफत कोर्सेस सेमिनारला इंदापूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद - प्रा. सुदर्शन आवटे"

Image
इंदापूर (वार्ताहर) :      विद्या प्रतिष्ठान कॉमर्स अँड सायन्स कॉलेज माजी विद्यार्थी संघटना आणि शौर्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री माननीय दत्तात्रय मामा भरणे यांचे चिरंजीव श्रीराजभैया भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि. १० डिसेंबर २०२२ रोजी आयटी क्षेत्रातील विविध कोर्सेसबाबत मोफत सेमिनार आयोजित करण्यात आले होते. रविवार  दि. ११ डिसेंबर पासून उमेदवारांनी निवडलेल्या कोर्सेसचे रजिस्ट्रेशन पूर्ण करून सोमवारपासून प्रशिक्षण चालू होईल, अशी माहिती माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुदर्शन आवटे यांनी दिली.  या सेमिनारचा उद्घाटन सोहळा शनिवार दि. १० डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ठीक ११ वाजता महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री माननीय आमदार दत्तामामा भरणे व उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री. गणेश इंगळे तसेच इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्री.तय्यब मुजावर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. या प्रशिक्षणासाठी टाटा स्ट्राइवचे सीनियर प्रोजेक्ट कॉर्डिनेटर माननीय श्री.सुबोध जाधव सर व क्षितिज जोगदंड , लीड ...

"कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य अनमोल: प्राचार्य डॉ. गौतम भोंग "

Image
चिंचवड (प्रतिनिधी):            चिंचवड येथील संघवी केशरी महाविद्यालयात २२ सप्टेंबर रोजी पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळ व सांस्कृतिक विभाग यांच्याद्वारे करण्यात आले होते. याप्रसंगी  प्राचार्य डॉ.गौतम भोंग यांनी कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन केले व आपले मनोगत व्यक्त करताना ते  म्हणाले की, "कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य अनमोल असून त्यांच्यामुळेच सर्वसामान्य लोकांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचण्यास मदत झाली".    विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. नितिन जाबरे यांनी सदर कार्यक्रमाचे संयोजन केले होते.   याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख तसेच प्राध्यापकवृंद उपस्थित होता.

‘अक्षर मानव’चा मधुमक्षिका जीवनगौरव पुरस्कार डॉ. र. पु. फडके यांना, तर ‘मधुमक्षिका जीवनसन्मान पुरस्कार’ डॉ. क. कृ. क्षीरसागर यांना प्रदान

Image
पुणे, दि. २६ - जागतिक मधुमक्षिका पालन दिनानिमित्त 'अक्षर मानव' या सामाजिक संस्थेतर्फे मधुमक्षिकापालन क्षेत्रातील आशिया खंडातील एकमेव संस्था उभी करण्यात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या डॉ.र.पु. फडके यांचा ‘मधुमक्षिका जीवन गौरव पुरस्कारा’ने तर ‘मधुमक्षिका जीवनसन्मान पुरस्कारा’ने मधमाश्यांचा प्रचार, प्रसार आणि संशोधनात भरीव कामगिरी करणाऱ्या डॉ. क. कृ. क्षीरसागर यांचा नुकताच गौरव करण्यात आला. रविवारी इंद्रधनुष्य सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते श्री. आर.आर. केडगे आणि प्रगतिशील शेतकरी व उद्योजक श्री.बच्चे पाटील यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. यावेळी अक्षर मानव मधुमक्षिकापालन विभागाचे राज्यप्रमुख प्रशांत सावंत, ज्येष्ठ नाट्यकर्मी सतीश इंदापूरकर, प्रा. प्रवीण जावळे आणि अक्षर मानव प्रशासन विभागप्रमुख सचिन पवळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा.प्रवीण जावळे यांनी अक्षर मानवची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमात ‘मधमाशीपालनातील पुढील दिशा’ या विषयावर मान्यवरांनी मतं व्यक्त केली. तसेच मधमाशीपालनाचं महत्त्वही मान्यवरांनी उलगडून सांगितले. मधमाशीपालनात अधि...

" घरगुती विद्युत उपकरणे दुरुस्ती प्रशिक्षणाचे महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्यावतीने मोफत आयोजन "

Image
            बँक ऑफ महाराष्ट्र पुरस्कृत महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था हडपसर, पुणे, यांच्यावतीने ग्रामीण तसेच निमशहरी भागातील इच्छुक नवीन उद्योजक युवक युवती स्वयं सहाय्यता बचतगट यांना आपला व्यवसाय चालू करावा यासाठी महाबँक आरसेटी मार्फत घरेलू विद्युत उपकरण उद्यामी (दुरुस्ती) या ३० दिवसीय मोफत प्रशिक्षणाची सुरुवात दिनांक ०१ एप्रिल २०२२ पासून करत आहेत. तरी इच्छुक प्रशिक्षणर्थ्यांनी नमूद तारखेस उपस्थित राहावे. प्रशिक्षणात शिकवले जाणारे विषय प्रात्यक्षिक दुरुस्ती- फ्रिज, वॉशिंग मशीन,फॅन,फिल्टर,कुलर,गिझर,मिक्सर, LED लाईट, आणि सोलर लाईट आणि इतर.        उद्योजकीय विकास प्रशिक्षण - व्यवसाय निवड,विक्री व्यवस्थापन, संभाषण कौशल्य,स्वतः बद्द्ल आत्मविश्वास,बँक कर्ज प्रस्ताव, विविध बँकिंग आणि शासकीय अनुदान योजना, विविध व्यावसायिक खेळ इ. सूचना :- 1) संपूर्ण प्रशिक्षण मोफत आहे 2)निवासाची व्यवस्था मोफत  3) नाष्टा चहा जेवण मोफत  4) प्रशिक्षण कालावधी - ०१/०४/२०२२ ते ३०/०४/२०२२ 5) वय 18 ते 45 6) मुलाखत दिनांक  : 29 मार्...

"पूर्णवेळ तासिका तत्त्वावर इंग्रजी विषयासाठी सहाय्यक प्राध्यापक भरती "

Image
मा. बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ,आळे, तालुका- जुन्नर जिल्हा- पुणे  येथे पूर्ण वेळ तासिका तत्त्वावर "इंग्रजी" विषयाच्या सहाय्यक प्राध्यापकाची भरती करण्यात येणार आहे. एकूण जागा : 01 प्रत्यक्ष मुलाखत दिनांक व वेळ : 22 मार्च 2022 , सकाळी 11 वाजता  जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. जाहिरात  

"भोंग प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम: विविध क्षेत्रांतील गुणवंताचा सत्कार संपन्न"

Image
निमगांव केतकी (प्रतिनिधी) :        संत सावतामाळी मंदिर निमगाव केतकी येथे भोंग प्रतिष्ठानच्या वतीने भोंग परिवारातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करून महात्मा जोतीराव फुले व सावित्रीमाई फुले यांचे प्रतिमा पुजन करण्यात आले. यावेळी धनश्री भोंग हीने अभंग म्हणून उपस्थितांची मने जिंकली.                                पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल सन्मानपञ देवून विजय उत्तम भोंग, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सन्मानपञाचे वाचन राजकुमार भोंग यांनी केले. त्याचबरोबर मीना भोंग उपसरपंच निमगाव केतकी, मच्छिंद्र भोंग उपसरपंच शेळगाव, सुधाकर भोंग हिंदी भाषारत्न पुरस्कार, सेट परीक्षा उत्तीर्ण वर्षा भोंग व अश्विनी भोंग, नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवलेले श्रेयशी भोंग, अर्णव भोंग, सातारा सैनिक स्कूल प्रवेश म...

" विद्या प्रतिष्ठानच्या इंदापूर येथील वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाची कोरोनाकाळातील शैक्षणिक वाटचाल कौतुकास्पद : प्रा.विशाल कोरे "

Image
इंदापूर (प्रतिनिधी):         विद्या प्रतिष्ठानच्या इंदापूर येथील वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाने कोरोनाच्या या काळामध्ये राबविलेले विविध शैक्षणिक उपक्रम उल्लेखनीय असून महाविद्यालयाची शैक्षणिक वाटचाल कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार विद्या प्रतिष्ठान संस्थेचे मुख्य ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा.विशाल कोरे यांनी काढले. महाविद्यालयामध्ये ट्रेनिंग आणि प्लेसमेंट तसेच उद्योजकता विकास यासंबंधी संस्थेतर्फे आगामी काळामध्ये राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन करण्याकरिता आज त्यांनी महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली होती. महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य डॉ.निर्मल साहूजी यांच्या हस्ते त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.     प्राचार्य डॉ.साहूजी यांनी यावेळी महाविद्यालयात राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांविषयीचे सादरीकरण केले, तसेच महाविद्यालयाच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा.तमन्ना शेख यांनी ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाचे सादरीकरण केले.       प्रा. विशाल कोरे यांनी यावेळी विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या सेंट्रल ट्रेनिंग...

" इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठानच्या वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा प्लेसमेंटमध्ये चढता आलेख "

इंदापूर (प्रतिनिधी):               इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठानच्या वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या अगोदरच प्लेसमेंटमध्ये भरीव कामगिरी केलेली आहे. या कामगिरीमध्ये नव्याने काही विद्यार्थ्यांनी भर टाकली असून त्यामुळे महाविद्यालयाच्या नावलौकिकात अजून वाढ झालेली आहे. बी.एस्सी.(संगणकशास्त्र) अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी कु. प्रतीक्षा नवगिरे हिची 'मेकॅट्रॉनिक्स सिस्टिम्स प्रा.लि.' या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये 'सॉफ्टवेअर इंजिनीअर' या पदावर , बी.सी.ए. अभ्यासक्रमाचा विद्यार्थी प्रथमेश पवार याची 'क्लोव्हर इन्फोटेक' या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये 'सिनियर इंजिनियर -टेक्निकल सपोर्ट'  या पदावर, बी.एस्सी. (संगणकशास्त्र) अभ्यासक्रमाचा विद्यार्थी अथर्व कुलकर्णी याची 'टी सिस्टिम्स' या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये 'असोसिएट कन्सल्टंट' या पदावर ट्रेनी म्हणून, तर बी.सी.ए. अभ्यासक्रमाचा विद्यार्थी शाहबाज मुलाणी याची 'पेगासस इन्फोकाॅर्प ' या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये ' प्रॉडक्शन सपोर्ट इंजिनीअर' या पदावर  प्लेसमेंटद्वारे निवड झालेली आहे.         ...

"ऋषिकेशची कलाक्षेत्रातील वाटचाल ही इंदापूरकरांसाठी आणि विद्या प्रतिष्ठानच्या वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब- प्राचार्य डॉ. निर्मल साहूजी"

Image
इंदापूर (प्रतिनिधी):                  इंदापूर (जि.पुणे) येथील उदयोन्मुख अभिनेता आणि विद्या प्रतिष्ठानच्या इंदापूर येथील वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी ऋषिकेश काळे याने अभिनय केलेल्या "गाडी घुंगराची" या मराठी गाण्याला रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या गाण्याला युट्युबवर एक कोटींपेक्षा जास्त लोकांनी पाहिले असून महाराष्ट्रभर तरुण वर्गामध्ये हे गाणे अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे. ऋषिकेशच्या या यशाबद्दल विद्या प्रतिष्ठानच्या इंदापूर येथील वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने त्याचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.निर्मल  साहूजी यांच्या हस्ते करण्यात आला.                  यावेळी प्राचार्य डॉ.निर्मल साहूजी म्हणाले की, इंदापूरसारख्या ग्रामीण भागात राहून सुद्धा ऋषिकेशने कला क्षेत्रात केलेली ही वाटचाल खरंच कौतुकास्पद आहे.त्याने मिळवलेले हे यश  आमच्या महाविद्यालयाच्या तसेच इंदापूरकरांच्या दृष्टीने खूप मोठी अभिमानाची बाब आहे. या सत्कारप्रसंगी ऋषिकेशने आपले मनोगत व्...

"इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठानच्या वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा. सुदर्शन आवटे तर उपाध्यक्षपदी राहुल गुंडेकर यांची निवड"

Image
इंदापूर (प्रतिनिधी):     इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठानच्या वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मध्ये नुकतीच माजी विद्यार्थी संघटना स्थापन करण्यात आली. या संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा. सुदर्शन आवटे यांची,उपाध्यक्षपदी युवा उद्योजक राहुल गुंडेकर यांची आणि सचिवपदी प्रा.जावेद शेख यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निर्मल साहूजी यांच्या हस्ते या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.          यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. निर्मल साहूजी म्हणाले की, माजी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्राप्त केलेले यश ही प्रत्येक महाविद्यालयासाठी गौरवाची बाब असते.आपल्या महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम कसे राबवता येतील याविषयी या माजी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आखणी करून महाविद्यालयाच्या नावलौकिकात अजुन भर टाकावी.  या नवीन शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयामध्ये अगोदर चालू असणाऱ्या बी.बी.ए., बी.सी.ए., बी.सी.एस. या अभ्यासक्रमांबरोबरच बी.एस्सी. व  बी....

"माध्यमिक विद्यालय कर्मचारी जुलै वेतनवाढ कॅम्प इंदापूर तालुक्यात संपन्न"

Image
इंदापूर (प्रतिनिधी):                   इंदापूर तालुक्यातील माध्यमिक विद्यालयांमधील  सर्व कर्मचा-यांच्या जुलै 2021 वेतनवाढीसंबंधीचा कॅम्प 26 व 27 जुलै 2021 रोजी संपन्न झाला. पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग,पुणेच्या वेतन पथकाच्या शिक्षणाधिकारी मा.कविता शिंपी मॅडम यांचे आदेशानुसार आणि या विभागाचे राजेंद्र खरे यांचे मार्गदर्शनाखाली हे कॅम्प आयोजित करण्यात आले होते. दि. 26 व 27 जुलै 2021रोजी इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथील एन. ई एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आणि  कौठळी येथील नूतन माध्यमिक विद्यालय या दोन ठिकाणी हे कॅम्प आयोजित करण्यात आले होते.             ज्या सेवकांना जुलै 21 मध्ये वेतन वाढ देय आहे त्यांची वेतन वाढ ते ज्या लेव्हल मध्ये/स्केल मध्ये वेतन घेतात त्या मधील पुढील टप्पा बरोबर आहे का याची खात्री करून वेतनवाढ फॉरवर्ड करण्यात आली.यामध्ये वेतनवाढ प्रस्तावाच्या 63 शाळा पूर्ण झाल्या.               हा उपक्रम खूपच शिस्तबद्ध पद्धतीत राबविण्यात आल्याचे मत म...

"निमगांव केतकी येथे दहावीच्या 1984 बॅचकडून गुरुपौर्णिमा साजरी"

Image
निमगांव केतकी ( प्रतिनिधी ):     निमगांव केतकी (ता.इंदापूर,जि.पुणे) येथील श्री.केतकेश्वर विद्यालयातील 1984 सालच्या इयत्ता 10 वी उत्तीर्ण बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांवरील प्रेमापोटी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुजनांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान केला आणि त्यांचे आशिर्वाद घेतले.  उद्योजक धनंजय चांदणे,मिलिंद कुलकर्णी सर,भाजीपाल्याचे प्रसिद्ध व्यापारी बाळासाहेब काळे,व्यावसायिक संजय व्होरा,प्रदीप जौंजाळ या 1984 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी श्री.जौंजाळ सर आणि श्री.एस.बी.शिंदे सर या गुरुजनांचा त्यांच्या घरी जाऊन सन्मान केला आणि त्यांचे आशिर्वाद घेऊन ही गुरुपौर्णिमा खऱ्या अर्थाने साजरी केली.