"इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठानच्या वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा. सुदर्शन आवटे तर उपाध्यक्षपदी राहुल गुंडेकर यांची निवड"
इंदापूर (प्रतिनिधी):
इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठानच्या वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मध्ये नुकतीच माजी विद्यार्थी संघटना स्थापन करण्यात आली. या संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा. सुदर्शन आवटे यांची,उपाध्यक्षपदी युवा उद्योजक राहुल गुंडेकर यांची आणि सचिवपदी प्रा.जावेद शेख यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निर्मल साहूजी यांच्या हस्ते या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. निर्मल साहूजी म्हणाले की, माजी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्राप्त केलेले यश ही प्रत्येक महाविद्यालयासाठी गौरवाची बाब असते.आपल्या महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम कसे राबवता येतील याविषयी या माजी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आखणी करून महाविद्यालयाच्या नावलौकिकात अजुन भर टाकावी.
या नवीन शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयामध्ये अगोदर चालू असणाऱ्या बी.बी.ए., बी.सी.ए., बी.सी.एस. या अभ्यासक्रमांबरोबरच बी.एस्सी. व बी.कॉम. हे दोन नवीन पदवी अभ्यासक्रम सुरू होत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मूलभूत विज्ञानाचे आणि वाणिज्य शाखेचे शिक्षण घेणे सोयीस्कर होणार आहे.
यावेळी प्रा.सुदर्शन आवटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की, या माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.तसेच युवा उद्योजक राहुल गुंडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक किंवा इतर अडीअडचणी दूर करण्यासाठी आम्ही वेळोवेळी निश्चितच प्रयत्न करू.
या कार्यक्रमप्रसंगी बीसीए विभागप्रमुख प्रा.निलेश काळदाते, बीसीएस विभागप्रमुख प्रा.सर्फराज शेख, ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा. तमन्ना शेख, शैक्षणिक संशोधन समन्वयक प्रा.ज्योती टेके, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.आदेश बनकर, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.गणेश साखरे, सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक प्रा.स्वप्नील भंडारे, प्रा.हनुमंत हेगडे , प्रा.संदीप ननवरे, प्रा.तृप्ती भोंग,ग्रंथपाल विनायक गायकवाड , प्रा.फारुख तांबोळी,प्रा.बागवान तसेच ऋषिकेश काळे हे उपस्थित होते.