"ऋषिकेशची कलाक्षेत्रातील वाटचाल ही इंदापूरकरांसाठी आणि विद्या प्रतिष्ठानच्या वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब- प्राचार्य डॉ. निर्मल साहूजी"
इंदापूर (प्रतिनिधी):
इंदापूर (जि.पुणे) येथील उदयोन्मुख अभिनेता आणि विद्या प्रतिष्ठानच्या इंदापूर येथील वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी ऋषिकेश काळे याने अभिनय केलेल्या "गाडी घुंगराची" या मराठी गाण्याला रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या गाण्याला युट्युबवर एक कोटींपेक्षा जास्त लोकांनी पाहिले असून महाराष्ट्रभर तरुण वर्गामध्ये हे गाणे अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे. ऋषिकेशच्या या यशाबद्दल विद्या प्रतिष्ठानच्या इंदापूर येथील वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने त्याचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.निर्मल साहूजी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी प्राचार्य डॉ.निर्मल साहूजी म्हणाले की, इंदापूरसारख्या ग्रामीण भागात राहून सुद्धा ऋषिकेशने कला क्षेत्रात केलेली ही वाटचाल खरंच कौतुकास्पद आहे.त्याने मिळवलेले हे यश आमच्या महाविद्यालयाच्या तसेच इंदापूरकरांच्या दृष्टीने खूप मोठी अभिमानाची बाब आहे.
या सत्कारप्रसंगी ऋषिकेशने आपले मनोगत व्यक्त केले. तो म्हणाला की, महाविद्यालयीन स्तरावर विविध कार्यक्रमांमधून केलेले सूत्रसंचालन, विविध उपक्रमांमध्ये घेतलेला सक्रिय सहभाग, "सरपण" सारख्या एकांकिकेद्वारे स्पर्धेमध्ये घेतलेला सहभाग व त्यामध्ये मिळवलेले यश या सर्व गोष्टींमुळे मी आज या यशाकडे वाटचाल करत आहे .
ऋषिकेशने "गाडी घुंगराची" या गाण्याबरोबरच छोट्या पडद्यावर "कारभारी- लय भारी " या मालिकेमध्ये भूमिका साकारली असून ग्रामीण भागात प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या "चांडाळ चौकडीच्या करामती" या वेब सेरीजमध्ये देखील एक आगळीवेगळी भूमिका साकारलेली आहे . त्याबरोबरच त्याने "नको वाऱ्यावणी फिरू" आणि "माझी माय" या दोन गाण्यांमध्येदेखील अभिनय केलेला आहे. ही गाणी सुद्धा रसिकांमध्ये सध्या लोकप्रिय होत आहेत.
ऋषिकेशच्या "गाडी घुंगराची" या लोकप्रिय गीताची यूट्यूब लिंक खालील प्रमाणे आहे.
या कार्यक्रमप्रसंगी बीसीए विभागप्रमुख प्रा.निलेश काळदाते, बीसीएस विभागप्रमुख प्रा.सर्फराज शेख, ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा. तमन्ना शेख, शैक्षणिक संशोधन समन्वयक प्रा.ज्योती टेके, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा.सुदर्शन आवटे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.आदेश बनकर, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.गणेश साखरे, माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष युवा उद्योजक राहुल गुंडेकर, सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक प्रा.स्वप्नील भंडारे, प्रा.हनुमंत हेगडे , प्रा.संदीप ननवरे, प्रा.तृप्ती भोंग,ग्रंथपाल विनायक गायकवाड , प्रा.फारुख तांबोळी,प्रा.जावेद शेख, प्रा.बागवान हे उपस्थित होते.