" इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठानच्या वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा प्लेसमेंटमध्ये चढता आलेख "
इंदापूर (प्रतिनिधी):
इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठानच्या वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या अगोदरच प्लेसमेंटमध्ये भरीव कामगिरी केलेली आहे. या कामगिरीमध्ये नव्याने काही विद्यार्थ्यांनी भर टाकली असून त्यामुळे महाविद्यालयाच्या नावलौकिकात अजून वाढ झालेली आहे. बी.एस्सी.(संगणकशास्त्र) अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी कु. प्रतीक्षा नवगिरे हिची 'मेकॅट्रॉनिक्स सिस्टिम्स प्रा.लि.' या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये 'सॉफ्टवेअर इंजिनीअर' या पदावर , बी.सी.ए. अभ्यासक्रमाचा विद्यार्थी प्रथमेश पवार याची 'क्लोव्हर इन्फोटेक' या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये 'सिनियर इंजिनियर -टेक्निकल सपोर्ट' या पदावर, बी.एस्सी. (संगणकशास्त्र) अभ्यासक्रमाचा विद्यार्थी अथर्व कुलकर्णी याची 'टी सिस्टिम्स' या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये 'असोसिएट कन्सल्टंट' या पदावर ट्रेनी म्हणून, तर बी.सी.ए. अभ्यासक्रमाचा विद्यार्थी शाहबाज मुलाणी याची 'पेगासस इन्फोकाॅर्प ' या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये ' प्रॉडक्शन सपोर्ट इंजिनीअर' या पदावर प्लेसमेंटद्वारे निवड झालेली आहे.
महाविद्यालयामार्फत वेळोवेळी राबविल्या गेलेल्या विविध प्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या कार्यशाळांमुळे आपणांस हे यश प्राप्त झाल्याचे या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.निर्मल साहूजी यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक दर्जाच्या 'कोर्सेरा', 'इडीएक्स', 'स्वयंम' या ऑनलाइन शिक्षणाच्या पोर्टलवरील विविध विषयांचे कोर्सेस आम्ही विद्यार्थ्यांनी पूर्ण केल्यामुळे आम्हांला विविध तंत्रकौशल्य अवगत झाल्याचे मत प्रतीक्षा नवगिरे हिने आपल्या मनोगतात व्यक्त केले. ॲप्टीट्यूड ट्रेनिंग तसेच कम्युनिकेशन ट्रेनिंग यांच्या कार्यशाळांमुळे आम्हाला कंपन्यांद्वारे घेतल्या गेलेल्या परीक्षांना आत्मविश्वासाने सामोरे जाता आल्याचे मत प्रथमेश पवार याने व्यक्त केले.
या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकार्यांच्या वतीने या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले .तसेच या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.निर्मल साहूजी, बी.सी.एस. विभागप्रमुख प्रा. सर्फराज शेख , बी.सी.ए. विभाग प्रमुख प्रा. निलेश काळदाते , बी.बी.ए. विभागप्रमुख प्रा. सतीश भोंग, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा.तमन्ना शेख, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.आदेश बनकर यांनी पुढील करीअरसाठी शुभेच्छा दिल्या.