" विद्या प्रतिष्ठानच्या इंदापूर येथील वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाची कोरोनाकाळातील शैक्षणिक वाटचाल कौतुकास्पद : प्रा.विशाल कोरे "
इंदापूर (प्रतिनिधी):
विद्या प्रतिष्ठानच्या इंदापूर येथील वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाने कोरोनाच्या या काळामध्ये राबविलेले विविध शैक्षणिक उपक्रम उल्लेखनीय असून महाविद्यालयाची शैक्षणिक वाटचाल कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार विद्या प्रतिष्ठान संस्थेचे मुख्य ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा.विशाल कोरे यांनी काढले. महाविद्यालयामध्ये ट्रेनिंग आणि प्लेसमेंट तसेच उद्योजकता विकास यासंबंधी संस्थेतर्फे आगामी काळामध्ये राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन करण्याकरिता आज त्यांनी महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली होती. महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य डॉ.निर्मल साहूजी यांच्या हस्ते त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
प्राचार्य डॉ.साहूजी यांनी यावेळी महाविद्यालयात राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांविषयीचे सादरीकरण केले, तसेच महाविद्यालयाच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा.तमन्ना शेख यांनी ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाचे सादरीकरण केले.
प्रा. विशाल कोरे यांनी यावेळी विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या सेंट्रल ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेलद्वारे आगामी काळामध्ये राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची तसेच प्रशिक्षणाची माहिती दिली. तसेच, महाविद्यालयाच्या वाटचालीमध्ये ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकाऱ्याची काय भूमिका असते आणि त्याने विद्यार्थ्यांना कशाप्रकारे प्रोत्साहित केले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. काॅलेजदुनिया डॉट कॉम तसेच कॉलेज देखो डॉट कॉम यांसारख्या वेबसाईटवर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाविषयीचा आपला खरा अभिप्राय योग्य प्रकारे नोंदवणे,ही आजच्या ऑनलाईन शिक्षणाच्या काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.महाविद्यालयाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे कामकाज यशस्वीपणे पार पाडण्यात माजी विद्यार्थ्यी संघटनेची महत्त्वपूर्ण भूमिका असते,त्यामुळे महाविद्यालयाची माजी विद्यार्थी संघटना नेहमीच विविध उपक्रमांच्या माध्यमातून कार्यरत राहिली पाहिजे. महाविद्यालयाच्या उद्योजकता विकास कक्षामार्फत विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय कौशल्ये विकसित केली पाहिजेत तसेच कमी भांडवलावर करता येण्याजोग्या विविध उद्योगांचे प्रशिक्षण त्यांना दिले पाहिजे जेणेकरून ते स्वतःच्या पायावर उभे राहतील.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.निर्मल साहूजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.ते म्हणाले की,सध्याच्या काळात ऑनलाईन शिक्षणातील विद्यार्थ्यांची रुची वाढवण्यासाठी ऑनलाईन शिक्षण नाविन्यपूर्ण पद्धतीने देणे गरजेचे आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैक्षणिक संशोधन समन्वयक प्रा.ज्योती टेके यांनी केले. तसेच बी.सी.एस. विभागप्रमुख प्रा. सर्फराज शेख यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. यावेळी बी.सी.ए. विभाग प्रमुख प्रा. निलेश काळदाते, बी.बी.ए. विभागप्रमुख प्रा.सतीश भोंग, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.आदेश बनकर , माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा.सुदर्शन आवटे , विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.गणेश साखरे हे उपस्थित होते.