Posts

" ख्यातनाम लोककला संशोधक डॉ.गणेश चंदनशिवे यांचे राष्ट्रीय नाटय विद्यालयात तमाशा प्रशिक्षण "

Image
नवी दिल्ली ( प्रतिनिधी) :-          आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त लोककला संशोधक तथा मुंबई विद्यापीठ लोककला अकादमीचे प्रमुख प्रा.डॉ.गणेश चंदनशिवे हे  भारतातील नाट्यशास्त्राचे प्रशिक्षण देणारी सर्वोच्च संस्था अर्थातच दिल्ली येथील राष्ट्रीय नाट्य विद्यालयातील (NSD ) विद्यार्थ्यांना  महाराष्ट्राचा अस्सल रांगडा तमाशा शिकवणार आहेत.  आज पारंपरिक तमाशाला कधी दुष्काळाचा सामना करावा लागतो तर कधी पावसाच्या सावटाचा ,कधी यात्रा जत्रातील परवानगीचा तर कधी आचार संहितेचा .अशा प्रतिकूल परिस्थितीतही तमाशा टिकून आहे आपले पारंपरिक अस्तित्व घेऊन. अशा प्रतिकूल परिस्थित भारतातील इतर लोककलावंत आपल्या राज्यातील लोककला इतर राज्यात पोहचवण्यासाठी धडपडत आहेत. जसा गुजरातचा भवाई ,उत्तर प्रदेशची नौटंकी ,ओरिसाचा छाऊ ,प. बंगालचा बाऊल ,छत्तीसगडची पांडवणी तशीच  महाराष्ट्राची अस्सल रांगडी लोककला तमाशा .आता महिनाभर या भारतभरातील मुलांना तमाशाचा इतिहास ,त्याची जडण घडण ,त्यातील कलावंतांचे योगदान ,त्यातील घटक ,तमाशाचे पूर्ववैभव ,आजच्या काळातील तमाशाची अवस्था  आणि त्याचे सादरीकरण य...

अंबादास टल्लु फाउंडेशनच्या वतीने बुधवार,दिनांक 27 मार्च 2024 रोजी "प्रकट मुलाखत आणि शास्त्रीय संगीताची सुश्राव्य मैफल"

Image
पुणे( वार्ताहर):          अंबादास टल्लु फाउंडेशन (रजि.)  पुणे - ५१ यांच्या वतीने चुकवू नये अशी "प्रकट मुलाखत आणि शास्त्रीय संगीताची सुश्राव्य झलक मैफल" बुधवार दिनांक 27 मार्च 2024 रोजी, सायंकाळी 05:00 ते 07:00 या वेळेत, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे, 'न्यू इंग्लिश स्कूल' येथील, 'गणेश सभागृह', टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.         या मैफलीमध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त , भारतीय परंपरेच्या शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याचे, ज्येष्ठ दिग्गज व सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित अजय पोहनकर यांची एकमेवाद्वितीय अशी उत्कट व थेट प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे.         ही  मुलाखत भारतीय शास्त्रीय संगीताचे प्रेमी व गाढे अभ्यासक  सर्वश्री श्री. मुकुंद संगोराम (लोकसत्ता या सुप्रसिद्ध मराठी दैनिक वृत्तपत्राचे नामवंत ज्येष्ठ संपादक) हे स्वतः घेणार असून या कार्यक्रमाचे निवेदन श्री आनंद देशमुख  ( सवाई गंधर्व फेम ) हे करणार आहेत.           ...

"सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात एक दिवसीय ऊस किड व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न"

Image
केडगांव ( वार्ताहर ) :                   सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे संलग्नित नेताजी शिक्षण संस्थेचे सुभाष बाबुराव कुल कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, केडगाव, विद्यार्थी विकास मंडळ व अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी एक दिवसीय ऊस किड व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेअंतर्गत प्रथम सत्रामध्ये मा.श्री कांतीलाल रणदिवे (सेंद्रिय शेती अभ्यासक व प्रगतशील शेतकरी) यांनी ऊस किड व्यवस्थापन आणि गुळ प्रक्रिया या विषयावर विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यांनी सेंद्रिय ऊस शेतीचे महत्व, मशागतीचे प्रकार, घरगुती रोपवाटिका, ऊस पिकाला पाणी देण्याची वेळ व वारंवारिता या संदर्भात मार्गदर्शन केले तसेच रासायनिक शेतीचे दुष्परिणाम मानवी आरोग्यावर कसे होतात याचे विवेचन केले, ऊस पिकावर पडणाऱ्या खोडकिडा, पिठ्या ढेकूण, लोकरी मावा, हुमणी या किडींच्या संदर्भात कीड नियंत्रणासाठी सेंद्रिय पद्धतीने कसे उपाय करावेत यासंबंधी सखोल माहिती दिली. ऊस कीड व्यवस्थापनासाठी चुन्याची निवळी,गावरान तंबाखूचे मिश...

"श्री.केतकेश्वर वि‌द्यालयात मराठी भाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा"

Image
निमगांव केतकी ( वार्ताहर):                जेष्ठ साहित्यकार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जाणारा मराठी राजभाषा गौरव दिवस आणि डॉ.सी. व्ही. रामन यांच्या स्मरणार्थ साजरा जेला जाणारा जागतिक विज्ञान दिवस विद्यालयात दोन दिवसीय विविध संस्कृतिक उपक्रमांनी जल्लोषात आणि आनंदात साजरा करण्यात आला.      विद्यालयातील मराठी आणि विज्ञान विषयाच्या अध्यापकांनी संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले आणि इतर सर्वच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.   दोन दिवसीय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष स्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. चव्हाण सर, उपमुख्याध्यापक श्री. एम.बी. भोंग सर, श्री.साळुंखे सर, श्री. के.डी. भोंग सर, श्री.कुलकर्णी सर, श्री.शिंदे सर, श्रीमती. ढाळे मॅडम यांनी भूषवले.       दोन दिवसीय कार्यक्रमात मराठी भाषा आणि संस्कृती टिकावी तसेच विज्ञान विषयी जोपासना आणि जनजागृती घडावी असे श्री.राऊत सर आणि श्री.खंडागळे सरांनी...

"पुरस्कार सर्वांची उमेद वाढविणारे हवे, कुणाला नाऊमेद करणारे नसावे"- डॉ.अनिल काकोडकर

Image
पुणे (वार्ताहर):        " चांगले काम करणाऱ्यांचे कौतुक म्हणजे पुरस्कार देणे , ही कौतुकाची बाब आहे. पुरस्कारातून इतरांना प्रेरणा मिळते. मात्र पुरस्कार सर्वांची उमेद वाढविणारे हवे, कुणाला नाऊमेद करणारे नसावे. "असे मत अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.           अंबादास टल्लू फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील पद्‌द्मभूषण व पद्मश्री पुरस्कार प्राप्त थोर व्यक्तींचा गौरव यापूर्वी पद्म पुरस्कार मिळालेल्या थोरांच्या हस्ते करण्यात आला. हा समारंभ यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पद्‌मश्री कुमार केतकर तर अध्यक्षस्थानी पद्‌मविभूषण डॉ. अनिल काकोडकर हे होते.           याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात डॉ. अनिल काकोडकर  म्हणाले की, "पद्म पुरस्कार मिळवणा-यांशी जवळीक साधण्याचा अंबादास टल्लू फाऊंडेशनचा उपक्रम कौतुकास्पद आहे. समाज किती प्रगल्भ आहे याची मोजदाद करतांना इंन्स्टीट्यूशन (संस्था), इन्फ्रास्ट्रक्टर (सोय...

"सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात 'अर्थशास्त्रातील करिअर' यावरील व्याख्यानसत्र संपन्न "

Image
केडगाव(वार्ताहर) :               सुभाष बाबुराव कुल महाविद्यालय, केडगाव येथे अर्थशास्त्र आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २ फेब्रुवारी २०२४ रोजी स्पर्धा परीक्षा आणि रोजगार संधी या विषयावर प्राचार्य डॉ. नंदकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानांतर्गत व्याख्यात्या कु.रश्मी शितोळे यांनी स्पर्धा परीक्षा रोजगार संधी या विषयावर सखोल व सविस्तर मार्गदर्शन केले. कु.रश्मी शितोळे या केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या भारतीय आर्थिक सेवा अर्थात IES परीक्षेत २०२४ मध्ये उत्तीर्ण झाल्या आहेत. विशेषतः त्यांनी अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या भारतीय आर्थिक सेवा या परीक्षेमध्ये उपलब्ध संधी, अभ्यासपद्धती,आव्हाने, अभ्यासक्रम आणि मुलाखत तंत्र या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ. टी. के. शेख, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.आर.एन.गायकवाड उपस्थित होते. तसेच एक...

"सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात 'अर्थशास्त्रातील करिअर' यावरील व्याख्यानसत्र संपन्न "

Image
केडगाव(वार्ताहर) :               सुभाष बाबुराव कुल महाविद्यालय, केडगाव येथे अर्थशास्त्र आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २ फेब्रुवारी २०२४ रोजी स्पर्धा परीक्षा आणि रोजगार संधी या विषयावर प्राचार्य डॉ. नंदकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानांतर्गत व्याख्यात्या कु.रश्मी शितोळे यांनी स्पर्धा परीक्षा रोजगार संधी या विषयावर सखोल व सविस्तर मार्गदर्शन केले. कु.रश्मी शितोळे या केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या भारतीय आर्थिक सेवा अर्थात IES परीक्षेत २०२४ मध्ये उत्तीर्ण झाल्या आहेत. विशेषतः त्यांनी अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या भारतीय आर्थिक सेवा या परीक्षेमध्ये उपलब्ध संधी, अभ्यासपद्धती,आव्हाने, अभ्यासक्रम आणि मुलाखत तंत्र या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ. टी. के. शेख, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.आर.एन.गायकवाड उपस्थित होते. ...

"सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात 'अर्थशास्त्रातील करिअर' यावरील व्याख्यानसत्र संपन्न "

"प्रबोधनदूत योजनेच्या पुणे जिल्हा समन्वयकपदी श्री.योगेश आदलिंग यांची निवड"

Image
निमगांव केतकी ( वार्ताहर) :                   श्री.केतकेश्वर विद्यालय आणि जुनिअर कॉलेज येथे आज राजमाता जिजाबाई व स्वामी विवेकानंद जयंती कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपशिक्षिका सौ.साधना तावरे मॅडम होत्या . त्यांनी तसेच इतर काही शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून नुकतेच नवनीत समूहाने Tr. फॉर टीचर या कॅम्पेन अंतर्गत आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित केलेले उपशिक्षक श्री.योगेश आदलिंग सर यांची ज्ञानप्रबोधिनी, पुणे यांच्यामार्फत राबवण्यात येणाऱ्या  'प्रबोधनदूत योजनेच्या जिल्हा समन्वयकपदी नेमणूक झाल्याने त्यांचा आज या कार्यक्रम प्रसंगी उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला.        यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री.भोंग एम.बी. यांनी श्री.आदलिंग सरांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.    यावेळी पर्यवेक्षक खान सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.भोंग के.डी. ...

" राज्य सरकारतर्फे खेळाडूंच्या पुरस्काराच्या रकमेत दहापटीने वाढ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे "

Image
चंद्रपूर, दि. 27  ( वार्ताहर):                       प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त विकासाचा 11 सूत्री कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून यात क्रीडा क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. याच धर्तीवर राज्य शासनानेही खेळाला प्रथम प्राधान्य दिले आहे. याचाच एक भाग म्हणून भविष्यातील ऑलंपिक स्पर्धेत खेळाडूंना प्रेरणा मिळावी, यासाठी राज्य शासनाने खेळाडूंच्या पुरस्काराच्या रकमेत दहा पटीने वाढ केली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. बल्लारपूर (जि. चंद्रपूर) तालुका क्रीडा संकूल येथे 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. तर बल्लारपूर येथे आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात मेडल प्राप्त खेळाडू मिळतील, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2036 मध्ये ऑलंपिक स्पर्धा भारतात घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याच अनुषंगाने चंद्रपूरमधून मिशन ऑलंपिकची सुरवात झाली असून सन 2036 म...

" सुप्रसिध्द दाक्षिणात्य अभिनेता राम चरण तेजा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट "

Image
मुंबई ( वार्ताहर):          दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिध्द अभिनेता राम चरण तेजा आणि त्यांची पत्नी उपासना यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली.                यावेळी मुख्यमंत्र्यांनी रामचरण यांचे पुष्पगुच्छ आणि श्री गणेशाची मूर्ती देऊन स्वागत केले. यावेळी चित्रपट क्षेत्रासह विविध विषयांवर चर्चा झाली.         यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, सौ.वृषाली श्रीकांत शिंदे  उपस्थित होते.

" मराठीचं 'रिंगाण' समृद्ध करणारी कामगिरी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे "

Image
"साहित्य अकादमीसाठी कांदबरीकार कृष्णात खोत यांचे अभिनंदन" मुंबई, दि. २१ :                   अस्सल ग्रामीण शैली हे मराठी भाषेचे वैभव आहे. या शैलीला भारतीय साहित्य विश्वात ओळख निर्माण करून देण्याची, भारतीय साहित्य विश्र्व समृद्ध करण्याची कामगिरी कादंबरीकार कृष्णात खोत यांनी केली आहे. त्यांच्या या शैलीवर आणि प्रतिभेवर साहित्य अकादमी पुरस्काराने शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांनी 'रिंगाण' मधून मराठी साहित्याचे रिंगण समृद्ध करणारी अभिमानास्पद कामगिरी केली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कादंबरीकार कृष्णात खोत यांचे साहित्य अकादमीचा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.          'आधुनिक जगरहाटीत ग्रामीण संस्कृती आणि आपल्या गावा- गावातील बदलत्या जीवनाचं नेमकं चित्रण करण्यात श्री. खोत यांचा हातखंडा आहे. तो त्यांनी आपल्या लेखनातून अनेकदा सिद्ध केला आहे. त्यांच्या अनेक कादंबऱ्यांनी वाचकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. त्यांच्या साहित्यकृतीचा सन्मान होण्याने मराठी साहित्य क्षेत्रातील नवोदितांसाठी...

" दंगलकार नितीन चंदनशिवे 20 जानेवारी 2024 रोजी बारामती साहित्यकट्टयावर "

Image
बारामती ( वार्ताहर) :                    दंगलकार नितीनजी चंदनशिवे हे तडफदार तसेच बंडखोर विचारांचे,व्यवस्थेला प्रश्न विचारणारे कवी म्हणून आपणां सर्वांना परिचित आहेत. 'बारामती साहित्यकट्टा क्रमांक- २७' चे निमंत्रित पाहुणे म्हणून नितीनजी बारामती साहित्यकट्टावर 'माणूसकी'चा जागर करायला येत आहेत. तारीख राखीव ठेवा. प्रवेश विनामुल्य आहे. वार व दिनांक: शनिवार, २० जानेवारी २०२४ वेळ : संध्याकाळी ५ ते ७  स्थळ : कै.भिकोबा तांबे सभागृह,मेडिकोज गिल्ड,तांबेनगर,बारामती. संपर्क: श्री.शशांक मोहिते       मो.नं. 9960066966 

"मएसोच्या देशपांडे विद्यालयात रंगला ४५ वा वार्षिक क्रीडा महोत्सव"

Image
  बारामती( वार्ताहर) :              बारामती येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कै . ग. भि . देशपांडे विद्यालयात ४५ व्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन प्रमुख पाहुणे नॅशनल खेळाडू शंतनू उचाळे व आयर्नमॅन अजिंक्य साळी यांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या  मुख्याध्यापिका रोहिणी गायकवाड होत्या . यावेळी स्नेहसंमेलन अध्यक्ष नानासो केसकर, क्रीडाध्यक्ष कुमार जाधव , पर्यवेक्षक राजाराम गावडे , चंदू गवळे , शेखर जाधव , सुजाता पांडकर , विद्यार्थी क्रीडा प्रतिनिधी श्रेया गवळी व आरुष शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते .             खेळ हा खिलाडूवृत्तीने खेळून खेळभावना दाखवावी असे आवाहन करून प्रमुख अतिथी शंतनू उचाळे यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या . आई-वडिलांप्रमाणे , शिक्षक नेहमीच आपल्याला घडविण्यासाठी आत्मविश्वास देत असतात , आधारस्तंभ होवून उभे राहत असतात . त्यामुळे लहानपणापासूनच काहीतरी ध्येय निश्चित करा आणि त्या ध्येयासाठी काम करा आणि ध्येयापर्य...

"ज्ञानसंवर्धिनी प्रशालेची राज्यस्तरीय शालेय डाॅजबाॅल स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी"

Image
शिरवळ ( वार्ताहर) :   क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र व लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,लातूर तसेच महाराष्ट्र डॉट बॉल संघटना यांच्या वतीने दिनांक नऊ ते अकरा डिसेंबर 2023 दरम्यान उदगीर ( जि. लातूर ) या ठिकाणी आयोजित राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेमध्ये शिरवळ(जि.सातारा) येथील ज्ञानसंवर्धिनी माध्यमिक विद्यालयाच्या 17 वर्षाखालील मुलींच्या संघाने चमकदार कामगिरी करत तृतीय क्रमांक मिळविला.जिल्हास्तर तसेच विभाग स्तरावर अव्वल कामगिरी करून राज्यस्तरावर शालेय स्पर्धेमध्ये मजल मारणारा प्रशालेतील हा पहिलाच संघ आहे.या संघातील कु.संस्कृती गाडगे व कु.समृद्धी नेवसे यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. तसेच, मुलांच्या संघातून चि.ऋतुराज माने याची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे .     मुलींच्या संघांमध्ये संस्कृती घाडगे, समृद्धी नेवसे,अनुष्का कांबळे, साक्षी धनवडे, गायत्री देवरासे, सृष्टी नेवसे,तन्वी जगताप,संस्कृती सोमवंशी,प्रज्ञा तळेकर व अनुजा चव्हाण या विद्यार्थिनींचा समावेश होता.या स्पर्धेसाठी त्यांना क्रीडाशिक्षक सौ.भंडलक...