"श्री.केतकेश्वर विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा"
निमगांव केतकी ( वार्ताहर):
जेष्ठ साहित्यकार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जाणारा मराठी राजभाषा गौरव दिवस आणि डॉ.सी. व्ही. रामन यांच्या स्मरणार्थ साजरा जेला जाणारा जागतिक विज्ञान दिवस विद्यालयात दोन दिवसीय विविध संस्कृतिक उपक्रमांनी जल्लोषात आणि आनंदात साजरा करण्यात आला.
विद्यालयातील मराठी आणि विज्ञान विषयाच्या अध्यापकांनी संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले आणि इतर सर्वच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
दोन दिवसीय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष स्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. चव्हाण सर, उपमुख्याध्यापक श्री. एम.बी. भोंग सर, श्री.साळुंखे सर, श्री. के.डी. भोंग सर, श्री.कुलकर्णी सर, श्री.शिंदे सर, श्रीमती. ढाळे मॅडम यांनी भूषवले.
दोन दिवसीय कार्यक्रमात मराठी भाषा आणि संस्कृती टिकावी तसेच विज्ञान विषयी जोपासना आणि जनजागृती घडावी असे श्री.राऊत सर आणि श्री.खंडागळे सरांनी प्रस्ताविकात प्रतिपादन केले तसेच श्री.कुलकर्णी सर, श्रीमती.सावंत मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. आणि त्यासाठी दोन्ही दिवशी कार्यक्रमाची सुरुवात मराठी आणि विज्ञान च्या पुस्तके आणि ग्रंथ दिंडी ने करण्यात आली.
तसेच विध्यार्थ्यांनी नृत्य, गायन, नाटक, एकपात्री प्रयोग, भाषण अश्या विविध संस्कृतिक कार्यक्रम श्री.आदलिंग सर, श्री. शिंदे सर, श्री.माने सर आणि श्रीमती. खोजे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केले आणि कार्यक्रमाला रंगत आली.
श्रेयश राऊत आणि युगांत खरात तसेच इतर विद्यार्थ्यांच्या भाषणाने टाळ्या मिळविल्या.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.योगेश आदलिंग सर आणि श्री.राहुल माने सर यांनी केले तसेच आभारप्रदर्शन श्री.उपदेश भोसले सर यांनी केले